शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातील वास्तूंची दुरुस्ती, नूतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:49 IST

येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआश्रम प्रतिष्ठानची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.येत्या २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु असून त्या कामांमध्येच आश्रमातील दुरूस्तीची आणि नुतणीकरणाचे कामे करावी. जुन्या गोशाळेच्या परिसरातील तीन गोदामाचे फ्लोरींग, प्लास्टर आणि दुरूस्तीचे काम, पाण्याची टाकी बांधण्यात यावी. हुतात्मा स्मारकाच्या बाजुला प्रतिष्ठानची जागा आहे त्या जागेवर शाँपींग काँम्प्लेक्स बांधावे. यात्री निवासच्या व प्रदर्शनीच्या मागील बाजूस संरक्षण भिंत बांधावी.स्वागत कक्षाच्या चारही बाजुची जमीन समतल करून सुशोभित करणे, जुन्या गोशाळेतील कार्यकर्ता निवासाची दरुस्ती व त्यावर टिना टाकून प्लास्टर करून छफाई करावी. यासोबतच यात्री निवासच्या कार्यालयाची दुरुस्ती, गांधीजींच्या काळातील जुन्या पोस्ट कार्यालयाचे नुतनीकरण, नवीन गोशाळेच्या गोदामाचे फ्लोरींग, विहीरींचे खोलीकरण आदी कामे करण्यात यावी, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांना आश्रम भेटी प्रसंगी निवेदनातून केली आहे.यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार आणि आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.