शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: April 29, 2016 02:09 IST

जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.

कर्जाची रक्कम ४७४ कोटी रुपये : सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आतवर्धा : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. यावर्षी ५३ हजारांवर शेतकरी खातेदार पुनर्गठणासाठी पात्र असून ४७४ कोटी रुपयांच्या रकमेचे पुनर्गठण केले जाणार आहे.यावर्षी जवळपास सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत निघाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याचा टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परिणामी, पीक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. कर्जाची वसुली न करता शेतकऱ्यांनी उचललेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८६७ शेतकरी यास पात्र असून त्याची रक्कम ४७४ कोटी ३७ लाख रुपये आहे. शेतकऱ्यांंच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे; पण सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च हाताबाहेर गेला आहे. उत्पन्न कमी, न मिळणारे भाव, त्यातून कोलमडलेल्या आर्थिक गणिताने थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. यात पुनर्गठन शेतकऱ्यांना कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्नच आहे. खरीप हंगामात ३० हजार ३२३ शेतकऱ्यांनी २६३ कोटी ६ लाख रुपये कर्जाची उचल केली. सोबतच ३२ हजार २६४ शेतकरी खातेदारांचे नुतनीकरण करून २८१ कोटी ७६ लाख रुपये कर्र्ज उपलब्ध करण्यात आले. ६२ हजार ५८७ शेतकरी खातेदारांना ५४४ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी दिले होते. यातील ५३ हजार ८३७ शेतकरी पुनर्गठणासाठी पात्र आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)कर्जाचा डोंगर वाढणार ?टंचाई जाहीर झाल्यानंतर कर्जाचे पुनर्गठन केले जाते. यापूर्वीही कर्ज पुनर्गठन झाले. त्या वेळच्या कर्जाची परतफेड व्हायची असताना नव्याने पुनर्गठन करीत कर्ज वाढविले जाणार आहे. गतवर्षी शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्या रकमेचे पुनर्गठन म्हणजेच पाच हप्ते पाडले जातील. यात शेतकऱ्यांना कर्ज फेडावे लागेल. पुनर्गठनानंतर शेतकऱ्यांना मागील वेळी उचललेल्या रकमेएवढे वा ऐपतीप्रमाणे कर्ज दिले जाईल. नवीन कर्जाची भर पडणार असल्याने परतफेड कशी करणार, हा प्रश्न आहे.आठ हजारावर शेतकऱ्यांनी केला कर्जाचा परतावाटंचाईची स्थिती असली तरी अनेक शेतकरी वेळेवर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यातील ८ हजार ७५० शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत ७० कोटी ४५ लाख रुपयांची परतफेड केली. यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर पहिला हप्ता जून २०१७ मध्ये भरावा लागणार आहे.