शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
3
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
4
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
6
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
7
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
8
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
9
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
10
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
11
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
12
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
13
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
14
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
15
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
16
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
17
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
18
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
19
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
20
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

लोकसहभागातून रेणकापूरची शाळा बनली डिजीटल

By admin | Updated: February 15, 2016 02:13 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या तंंत्रज्ञानाची कास धरत असल्याचे दिसत आहे. पटसंख्येच्या समस्येशी लढा देताना आम्ही खासगी शाळेच्या तुलनेत कमी नाही,

समीर कुणावार : शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास तंत्रज्ञानाची गरजसमुद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या तंंत्रज्ञानाची कास धरत असल्याचे दिसत आहे. पटसंख्येच्या समस्येशी लढा देताना आम्ही खासगी शाळेच्या तुलनेत कमी नाही, असे म्हणत येथील शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी शाळांच्या तुलनेत शिक्षण देण्याकरिता कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील रेणकापूर शाळा याचे एक उदाहरण ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या येथील शिक्षकांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली आहे. बोलकी भित्तीचित्रे, प्रसन्न करणारी डिजिटल चित्रे, मान्यवरांचे बोल, ई-लर्निंगद्वारे दिले जाणारे अध्ययन, अनुभव, स्क्रीन कास्टींगचा वापर करून विविध विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबी टॅबलेटचा शैक्षणिक वापर, विविध शैक्षणिक चलचित्रांचा वापर, शैक्षणिक विडीओ निर्मिती व स्टुडिओ यांच्या माध्यमातून येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. या डिजिटल शाळेचे आ. समीर कुणावार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. सोबतच तालुक्यातील काही शाळांच्या दुरवस्थेबद्दल खेदही व्यक्त केला. प्राथमिक शिक्षकांनी समाजाच्या सहभागाने अशा प्रकारच्या शाळा निर्माण केल्यास नक्कीच ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरण बदलेल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल तसेच शिक्षक पालक संबंध दृढ होण्यास मदत होईल, असा आशावाद आ. कुणावार यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या माजी शिक्षण सभापती उषाकिरण थुटे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती समुद्रपूर नंदा साबळे, उपसभापती अशोक वांदिले, नगराध्यक्ष शीला सोनारे, पाणी पुरवठा सभापती गजू राऊत, सभापती अंकुश मेश्राम, सभापती तारा अडवे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पिट्टलवार, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद राठोड, नगरसेविका सुनीता सुरापाम, दिनेश निखाडे, रेणकापूर शाळा समितीचे अध्यक्ष दिवाकर मडकाम, उपाध्यक्ष बेबी निखाडे, केंद्रप्रमुख नरेंद्र नाशिरकर, तसेच नगर पंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक नरेंद्र वाघ यांनी प्रास्ताविकातून शाळेची प्रगती व गरजा याबाबत माहिती विषद केली. संचालन मीना कापसे यांनी केले तर प्रास्ताविक नरेश वाघ यांनी केले. आभार गंगा आडे यांनी मानले. कार्यक्रमाला रंजना वरखेडे, मिलिंद म्हैस्के, अनंत म्हैस्के, नंदकिशोर शेंडे, विनायक मेंढे, पांडूरंग सुरपाम, शारदा मडावी. सविता डावे, कांचन बावणकर, संगीता कोराम, आयुष बुरबुरे, प्रीती म्हैस्के व गावकऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)