शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर लिज भूखंडांच्या नूतनीकरणात दिरंगाई

By admin | Updated: July 18, 2016 00:36 IST

नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली.

नागरिकांचा आरोप : नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सोबतच मूळ कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून घेत नागरिकांना परत केली. पालिकेने आता बुधवारी जाहिरात देत मूळ कागदपत्रे मागितली आहे. वास्तविक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय सुस्पष्ट आहे. पालिका प्रशासनच दिरंगाई करीत असल्याने संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्री-सदस्यीय समितीद्वारे भाडे निर्धारण, समितीने लिजवर दिलेले भूखंड १९९१ ते २०२१ या कालावधीसाठी नूतनीकरण करणे याबाबत दिलेला निर्णय अगदी सुस्पष्ट आहे. यात पालिकेच्या जाहीर सूचनेत नमूद बाबीबद्दल कुठलाही उल्लेख नाही. नागरिकांनी संबंधित विभागाकडे लिज संदर्भातील सर्व कागदपत्रे देऊन ११ महिने लोटली आहे; पण अद्यापही पालिकेने नूतनीकरणाबाबत कार्यवाही केलेली नाही. शिवाय दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नियमानुसार कार्यवाही करून सदर भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाईल, असे धमकीवजा विधान केले आहे. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत लिज धारकांचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी, नगर रचनाकार आणि न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या निर्णयानुसार पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे होते. लिज धारकांना पालिकेत बोलविण्याऐवजी रामनगर येथील प्रमुख ठिकाणी अधिकारी पाठवून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नूतनीकरण प्रकरणे त्वरित निकाली काढावी, अशी मागणी नगरसेवक संतोष ठाकूर यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेज सादर केल्यास नूतनीकरण करण्यात जाईल. आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार व शनिवारी नागरिकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटावे आणि मूळ दस्तावेजांची तपासणी करून भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे सांगितले. यामुळे लिजधारकांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रामनगर लिजधारकांनी नगर परिषदेने जाहीर केलेल्या दिवशी भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन संतोष ठाकूर यांनी केले आहे. निवेदन देताना वॉर्डातील केशव डाखोळे, डॉ. गोलावार, डॉ. भलमे, प्रा. देवतळे, विनोद देशमुख, दिनकर लोखंडे, पोराटे, मारोतराव राऊत, बोंडे, अनिल चाळके, नारायण चाळके, भांडवलकर, जडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)