शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू काढतोय डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:42 IST

जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ..........

ठळक मुद्देआजाराला घाबरून न जाता सावधगिरी बाळगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असला तरी जिल्ह्यात आॅल ईज वेल असल्याचे आरोग्य विभागाचे काही अधिकारी सांगतात. नागरिकांनीही सदर आजाराला घाबरून न जाता सदर आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून उपचार घेणे गरजेचे आहे.प्राप्त माहितीनुसार, इन्फलुएंझा हा हवेवाटे व स्पर्शावाटे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. ताप, डोकेदुखी, घशात खवखवणे, अंगदुखी, सर्दी, क्वचीत जुलाब ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. रुग्ण शिंकल्यानंतर आणि खोकलल्यानंतर या आजाराचे विषाणू हवेत पसरतात.त्यामुळे हा आजार इतरांनाही होण्याची शक्यता बळावते. तसा हा आजार सौम्य स्वरूपाचा असला तरी रक्तदाब, मधुमेह आणि स्थुलपणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करू शकतो. विशेष म्हणजे या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळीच उपचार घेणे हे आजाराची लागण झालेल्या व्यक्तीसाठी फायद्याचे ठरते. वर्धा जिल्ह्यात सध्या स्वाईन फ्ल्यू हा आजार आपले पायमुळ घट्ट करू पाहात असून नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच आवाहन जि.प.च्या आरोग्य विभागाने केले आहे.‘आॅसेलटूमीवीर’ ठरतेय प्रभावीस्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. सदर फ्लूची लक्षणे आढळल्यास दोन दिवसात आॅसेलटूमीवीर हे औषध सुरू केल्यास त्याचा चांगला फायदा रुग्ण बरा होण्यासाठी होत असल्याचे सांगण्यात येते.स्वाईन फ्लू हा विषाणू जन्य आजार आहे. त्याची लक्षणे आढळल्यास रुग्णाने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू