शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव-पुलगाव मार्ग शहराबाहेरून काढा

By admin | Updated: June 15, 2017 00:50 IST

शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी

अमर काळे : अतिक्रमणात व्यापाऱ्यांवर होणारा अतिरेक थांबवा लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी व नागरिकांवर करण्यात येत असलेली अतिरेकी कारवाई थांबवावी, अशी मागणी आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या तळेगाव-पुलगाव राज्यमार्गाचे विस्तारीकरण काम सुरू करण्याकरिता नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अनेक दुकांनाची तोडफोड करण्यात आली. नागरिकांच्या दारांसमोर खड्डे खोदून त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सोयीकरिता ३० लाख रुपये खर्चून बांधकाम विभागानेच बांधलेल्या भूमिगत नालीवरील स्लॅब तोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर सहा फुट खोल खड्डा पाडला. यात पावसाळ्यात पाणी साचून होणाऱ्या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सोयीकरता माजी आमदार डॉ. शरद काळे यांच्या निधीतून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला प्रवासी निवारा अकारणत पाडण्यात आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून उन्ह, पावसाचा सामना करावा लागत आहे. तळेगाव-पुलगाव राज्य मार्गा मध्यवस्तीतून गेल्यास शहराचे दोन भागात विभाजन होणार आहे. याचा दुष्परिणाम शहरातील जनजीवनावर होणार आहे. या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय, शाळा आदी असल्याने हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरणार आहे. रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात जीव गमवावा लागणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठही याच मार्गावर असल्याने व्यवसाय मोडकळीस येणार असून शेकडो तरूणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही, तो व्हावा; पण तळेगाव-पुलगाव महामार्ग शहराच्या बाहेरून काढावा, नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवस्तीत अतिक्रमण काढण्यापूर्वी दुकानदारांना व नागरिकांना त्यांच्या जागा आखून देत पूर्वसूचना द्यावी. नंतरच कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बेलवे, हरेश रावलानी, अनिल जैन, अनंत पांडे, विजय झेंडे, शे. मोहम्मद शे. रमजान, नितीन चिमोटे, अनिल राठी, करण मोटवाणी, कटियारी, आबीद अली इमदाद अली आदी उपस्थित होते.