शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:05 IST

दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

ऑनलाईन लोकमतवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग व्यक्तींचे मानधन त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार देण्यात यावे. संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे उत्पन्न २१ हजार असून ती अट रद्द करण्यात यावी. ओबीसी व सामान्य प्रवर्गातील दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य प्रमाणे देण्यात यावा. शिवाय त्यांच्याकरिता नाविन्यपूर्ण वेगळी योजना सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेले आरक्षित आसनावर कुणी अतिक्रमण करू नये याबाबत दक्षता घेण्यात यावी. नव्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये दिव्यांग बांधवांना सवलत देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी वेळीच खर्च करणे क्रमप्राप्त आहे. तो तात्काळ खर्च होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात याव्या. तसेच अनुदानात वाढ करावी. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल क्षीरसागर, दर्शना घुमे, चंद्रशेखर देशपांडे, किशोर काळबांडे, सुनील पल्हारे, धनराज घुमे, सुनील मिश्रा, हरिभाऊ हिंगवे, मोरेश्वर शेंडे, विकास दांडगे आदींची उपस्थित होती. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहे.