शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खत कारखान्यातील कामगारांवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 25, 2016 02:02 IST

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे.

शिवसेना : जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे. तो अन्याय दूर करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. उद्योग अधिनियम १९४७ च्या कायद्यानुसार थकित वेतन व सेवा संपुष्टात आणल्याने त्यांना सेवेच्या संलग्नतेसह मागील वेतनासह पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. याबाबत जिल्हा कामगार अधिकारी राजरत्न धुर्वे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ येथे गत पाच वर्षांपासून कार्यरत कामगार मनोहर धोंडबाजी सोनवणे (३३) रा. जयपूर, ता. सेलू व शुभम कमलाकर उईके (२७) रा. तळोदी, ता. सेलू यांना कुठलीही चुक नसताना ३० जून २०१६ रोजी कामावरून कमी केले. त्यांना त्वरित कामगार घेण्यात यावे. कामगारांकडे कृ.उ.वि. महामंडळ वर्धा येथे काम करीत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. कामगारांना नेमके वेतन किती आहे, पीएफ किती कपात होतो, हे माहिती नाही. वरिष्ठांना विचारणा केल्यास माहिती मिळत नाही. यासाठी पीएफ व वेतन पावती द्यावी. वेतनाचा दिनांकही निश्चित करावा. सुरक्षा सुविधा मिळत नाही. बुट, गणवेश, हातमोजे आदी फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये येणाऱ्या सुविधा द्याव्या. औषधोपचार, ठराविक सुट्टी मिळत नाही. कामगारांना पूर्ववत कामावर घेत कंपनी अ‍ॅक्टनुसार सुविधा द्याव्या, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख तुषार देवढे, प्रा. राजू गोरडे, कामगार प्रतिनिधी मनोज आतराम, गौरव भेलाये, विवेक मुंजेवार, गजानन बनकर, राजू ठेकेदार, अभय देवढे, मनोहर सोनवणे, नितेश राऊत, विजय कोहळे, उमेश राऊत यासह कामगार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)