शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका"!; पीडित मुलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:41 IST

Wardha News न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझे वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली.

ठळक मुद्देन्यायाधीशांना केली विनंतीआराेपी वडिलास ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नात्याला काळिमा फासण्याची घटना देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथे चार वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणात न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझे वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. तिच्या या विनंतीमुळे दुष्कृत्य करणाऱ्या बापाविषयी किती घृणा आहे, हे स्पष्ट हाेते. या प्रकरणात अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी निकाल देताना नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली.

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथील रहिवासी आहे. आरोपी हा पीडितेचा जन्मदाता बाप आहे. तिच्या आईचा ती लहान असतानाच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. आरोपी हा पूर्वी दारूविक्रीचा व्यवसाय करायचा, तसेच आरोपीच्या त्रासामुळे पीडिता ही एका बालगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, १ ऑगस्ट २०१७ ला आरोपी १३ वर्षीय पीडितेला घरी घेऊन गेला. त्यानंतर मध्यरात्री घरातील इतर सदस्य झोपून असताना कुणाला आवाज येऊ नये म्हणून निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला. शिवाय घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नाेंद घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना निरंजने यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

शिक्षेचे स्वरूप असे

या प्रकरणावर निकाल देताना न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १० नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा सश्रम कारावास, भादंविच्या कलम ५०६ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडिताला भविष्यात जगण्यासाठी तसेच शिक्षणाकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, वर्धाअंतर्गत तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक भरपाई देण्याचे आदेश केले आहेत.

सहा साक्षीदारांची तपासली गेली साक्ष

या प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. न्यायालयात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय