शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:36 IST

नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे,

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : न.प. कर्मचारी संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात हिंगणघाट न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रोजंदारीवरील सफाई कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्त मुंबई यांचे पत्रानुसार ५४८ रूपये प्रतिदिवसाप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच त्यांच्या वेतनात नियमानुसार वाढ करण्यात आलेली नसून ती करण्यात यावी. उच्च, सर्वोच्च सहीत अन्य न्यायालयाद्वारे प्राप्त झालेल्या समस्त न्यायप्रविष्ट कामगारांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे. स्थानिक नगर परिषदेत १० मार्च १९९३ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना वयाची ६० वर्षेपर्यंत सेवा तर नंतरच्या कर्मचाऱ्यांना वयाची ५५ वर्षापर्यंतची सेवा देण्याचे सूचविण्यात आले आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील कुठल्याही न.प. मध्ये अस्तित्वात नाही. नगर पालिकेत आवश्यक पदांवर काम करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने न. प. ची संपूर्ण कामकाजाची जबाबदारी रोजंदारी कर्मचारीच पार पाडीत आहे. अश्या स्थितीत सदर अट कामगारांसाठी अन्याय असून सर्वांना समान संधी प्रदान करावी. समस्त रोजंदारी कर्मचाऱ्यांना जिथे कार्यरत आहेत त्या ठिकाणी शासनाची पदभरतीची मंजुरी मागवून सेवेत कायम करावे. अथवा ५ जुलै २०१६ च्या शासकीय ठरावानुसार नगर परिषदेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना समायोजनाद्वारे न. पं. त कायम करण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागण्यांवर येत्या पंधरा दिवसाचे आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना गर्वदास वासेकर, रऊफ खान अजीज खान, खुशाल बावणे, चंपा सौदे, लीला चव्हाण, सुरेश गायकवाड, जाकीर हुसेन गुलाम अब्बास, संजय दुबे, दत्तु भजभुजे, गजानन चिरडे आदींची उपस्थिती होती.