शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तुरीला तहसीलदारांसमक्ष नकार

By admin | Updated: April 10, 2017 01:26 IST

शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत

शेतकऱ्यांचा आरोप : आर्वी बाजारातील प्रकारआर्वी : शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत असल्याचा प्रकार येथील बाजार समितीत तहसीलदारांच्या समक्षच उघड झाला. या व्यवहारात व्यापारी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कमाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची तपासणी करण्याकरिता एनसीएमसी कंपनीचा तज्ज्ञाची नेमणूक केलेली आहे. नाफेडच्या निकषाप्रमाणे ३ टक्के पर्यंत खराब दाणे असलेली तूर खरेदी केल्या जावू शकते. याचा लाभ उचलत जो मलीदा देईल, त्याची तूर पास करण्याचा प्रकार येथे होत आहे. तर निकषात बसणारी तूर नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे निराश झालेला शेतकरी वाहतुकीचा खर्च झेपत नसल्याने तो मार्कट यार्डवरच व्यापाऱ्याला ३,५०० रुपयांत विकतो. व्यापाऱ्याकडून तोच माल पुन्हा नाफेडचे कर्मचारी पास करून खरेदी करीत आहे. यात व्यापारी एका दिवसात सुमारे १,५०० रुपयांची कमाई बसल्या ठिकाणी करतो तर शेतकऱ्याला उत्पादनाला लागलेला पैसासुद्धा मिळत नसल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे वर्धा जिल्हा लोकसभा मतदार संघाचे महासचिव सचिन वैद्य यांनी केला असून चौकशीची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलवण्यावरुन पिंपरी पुनर्वसन येथील शेतकरी रज्जाक अली यांनी ६० क्विंटल तूर येथील मार्केट यार्डवर आणली. त्यांचा माल निकषपात्र असताना सुद्धा नाफेडच्या कर्मचाऱ्याने नापास केला. यामुळे सदर शेतकऱ्याने सचिन वैद्य यांच्या माध्यमातून येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांच्याकडे याची तक्रार केली. परिणामी, त्यांनी तहसीलदार विजय पवार व तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे यांना बाजारात पाठविले. तहसीलदार विजय पवार यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्याच्या हाताने रज्जाक अली यांच्या तुरीचा नमुना व यापूर्वी नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचा नमूना बोलविला. त्याचे परीक्षण त्यालाच करायला सांगितले. यात आधी खरेदी केलेल्या तुरीच्या नमुन्यात १.६२ टक्के खराब दाणे आढळून आले तर रज्जाक अली यांच्या तुरीच्या नमून्यात फक्त ०.५३ टक्केच खराब दाणे असल्याचे दिसून आले. येथेच नाफेड कर्मचाऱ्याची बदमाशी उघड झाली.