शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:41 IST

आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : श्वापदांच्या हैदोसाने ग्रामस्थ त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा. तसेच सदर गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या गावातील शेतकºयांना श्वापदांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. श्वापदांमुळे मात्र ग्रामस्थांना शेतात जाणे कठीण झाले आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच अन्य महत्त्वाच्या कामासाठी ग्रामस्थांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. येथे पोहचण्यासाठी जंगल परिसरातून जावे लागत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले असतात. जीव मुठीत घेऊनच ग्रामस्थ प्रवास करतात. या सर्व पाश्र्वभूमीवर येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.त्यामुळे या गावांचे पुनर्वसन गरजेचे झाले आहे. येथील ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहे.या गावांचे पुनर्वसन जंगल परिक्षेत्राच्या बाहेर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर ग्राम्स्थांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.निवेदन देताना राजू कदम, प्रशांत वानखेडे, शिरीष भांगे, मंगेश खवशी, अशोक विजेकर, हरीभाऊ जसुतकर, आश्विन शेंडे, धिरेंद्र शेंडे, निखिल कडु, रोशन पवार, दिनेश डेहनकर, जगदीश डोळे, सागर ठाकरे, अनिल लेंडे, विजय तभाने, उधाराम मंढाळे, पांडुरंग मडावी, सुखदेव उईके, मार्गेश्वर सलाम, सुधाकर वरटी, पुनिराम उईके, बालू शेंडे, किशोर पट्टे, किरण येडमे, नितेश शिरसाम, हरिदास भलावी, राधेश्याम अवथळे, नरेश डोळे, शेषराव सपकाळ, राजु सपकाळ, कृष्णा पेठकुले तसेच माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका व मरकसुर येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.शेती ठेवावी लागते पडीकआर्वी तालुक्यातील काही गावे बोरधरण व्याघ्र प्रकल्पालगत आहे. त्यामुळे या गावात वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. गावातील रहिवासी श्वापदांमुळे धास्तावलेले आहे. हा परिसर जंगलक्षेत्राने वेढलेला आहे. वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असून रोही, रानडुक्कर हे प्राणी शेतात शिरून नासाडी करतात त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.