शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन व भूसंपादनाची कामे वेळीच करा!

By admin | Updated: April 15, 2017 00:35 IST

पुनर्वसीत गावठाणात वाटप केलेल्या भूखंडाचे गाव नमुना सातबारा तयार करण्याचे कामे जवळपास पूर्ण झाली आहे.

-शैलेश नवाल वर्धा : पुनर्वसीत गावठाणात वाटप केलेल्या भूखंडाचे गाव नमुना सातबारा तयार करण्याचे कामे जवळपास पूर्ण झाली आहे. ही कामे १०० टक्के पूर्ण करून गाव नमुना सातबारा आॅनलाईन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या. आर्वी, देवळी, वर्धा येथील पुनर्वसन व भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तसेच वर्धा, आर्वी व देवळी येथील तहसीलदार उपस्थित होते. या सभेत नवाल यांनी मार्गदर्शन केले. आर्वी तालुक्यातील वागदा, नांदोरा (काळे), अंबिकापूर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावे. निंबोली येथील प्रकल्प्रग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी दौलतपूर येथील भूखंडाचे वाटप करावे. पुनर्वसन गावठाणातील देवळी (पुनर्वसन), पिंपळगाव (भो.), नेरी (पूनर्वसन) सालोड येथे पाणीटंचाई असून त्यांना आराखड्यात घेण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या. कारंजा तालुक्यातील खैरी (पूनर्वसन) येथील पाणी पाईपलाईनचे कामे पूर्ण करावे. शिरूड प्रकल्पाअंतर्गत कलम १३ (३) ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्पांचा पुनर्वसन अहवाल व योजना तयार करून प्रस्ताव सादर करावा. नटाळा (पुनर्वसन), पिपरी (मेघे) येथील प्रकल्पग्रस्तांना स्मशानभूमी व नागरी सुविधा द्यावी, आदी सूचना यावेळी केल्या.(स्थानिक प्रतिनिधी)