शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुनर्वसित गावे होत आहेत झुडूपमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:01 IST

निम्म वर्धा प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या गावातील मोकळे भूखंड, शासकीय भूखंड, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्ये जेसीबीच्या सहाय्याने झुडूपमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : सरपटणाºया प्राण्यांचा वावर कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : निम्म वर्धा प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या गावातील मोकळे भूखंड, शासकीय भूखंड, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्ये जेसीबीच्या सहाय्याने झुडूपमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर झुडूपांमध्ये सरपटणाºया प्राण्यांचा वावर राहत होता. परिसर स्वच्छ केल्या जात असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पुनर्वसित वसाहतीत मोकळ्या शासकीय भूखंडावर तसेच अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झुडप वाढले होते. या झुडूपांमध्ये सरपटणारे प्राणी तसेच रात्रीला जंगली प्राणी संचार करीत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. प्रकल्पग्रस्त गावातील निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्तीअंती लावण्यात आली होती. बैठकीला खासदार रामदास तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीत पुनर्वसित वसाहतीला झुडूपमुक्त करण्यासाठी तसेच काही गावातील पिण्याचे पाणी क्षारयुक्त असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर फल स्वरूप निम्म वर्धा प्रकल्पातील पुनर्वसित गावांना जेसीबी मशीन गावे झुडूपमुक्त करण्यासाठी देण्यात आली. सर्कसपूर, टोणा, ईठलापूर, राजापूर, अहिरवाडा, अंबिकापुर, निंबोली, नेरी मिझार्पुर या गावातील पिण्याचे पाणी क्षारमुक्त करण्यासाठी जल शुद्धीकरणाची योजना शासन स्तरावर मार्गी लागली आहे. दोन्ही महत्त्वाची कामे पुनर्वसित गावांमध्ये होत असल्याने गावातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. गाव परिसरात वाढलेल्या झुडपांचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत होता. झुडूपे काढली जात असल्याने भीतीचे सावट गावावरून हटले आहे.