शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन झाले; पण मूलभूत सुविधाच नाही

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़

वर्धा : प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ गावाचे पुनर्वसन तर केले; पण ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले़ यामुळे त्यांना खितपत जगावे लागत आहे़वर्धा जिल्ह्यात अनेक पुनर्वसित गावांबाबत हा प्रकार घडत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी का द्यायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा (घा़) तालुक्यातील मासोद येथे समस्यांनी कळस गाठला आहे़ पुनर्वसनाला २८ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप गावात रस्ते पोहोचले नाहीत़ नाल्या, पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ आर्वी तालुक्यातील महाकाळी येथे १९८६ मध्ये जलायशाची निर्मिती झाली़ या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मासोद गावाला त्रास होता़ यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले़ खरांगणा (मो़) ते कारंजा-कोंढाळी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या मासोदची लोकसंख्या १३०० च्या आसपास असून घरांची संख्या २०० वर आहे़ पुनर्वसित गाव असल्याने येथे सोयी, सुविधा असतील, असा समज होतो; पण तेथे सुविधांचा दुष्काळच दिसतो़ गावातील मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे रस्त्यांच्या स्थितीचे दर्शन घडवितो़ मासोद येथील घरांपुढे नाल्यांचे बांधकाम केले नाही़ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो़ बसस्थानक ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असून पावसाळ्यात ये-जा करताना चिखल तुडवावा लागतो़ नाल्या नसल्याने डबके साचते़ परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावात पथदिवे नसल्याने काळोखात चाचपडावे लागते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मासोद येथे मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)