शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ८२२ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:11 IST

गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्दे नाफेडचा मुहूर्त नाही : शासकीय तूर खरेदीकडे शेतकरी पाठ फिरविण्याचे संकेत

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या. शासकीय दराकरिता शेतकऱ्यांना ही नोंद आवश्यक असताना त्यांच्याकडून याकडे पाठ केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात आतापर्यंत केवळ ८२२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे समोर आले आहे.शेतकऱ्यांकडून तुरीची कापणी करून ती काढत बाजारात आणणे सुरू झाले आहे. वर्धा बाजारात आतापर्यंत ४०० क्ंिवटल नवीन तूर आल्याचे सांगण्यात आले. या तुरीला ४ हजार ६०० रुपयांचा दर मिळत असून शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी आशा आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा नाफेडच्या खरेदीकडे लागल्या असताना त्यांच्याकडून अद्याप खरेदी संदर्भात निर्णय घेण्यात आलेना नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे समोर येत असून नाफेडचे केंद्र सुरू करावे अशी मागणी आहे.यंदाच्या हंगामात कापूस उत्पादकांना बोंडअळीने आर्थिक अडचणीत आणल्याने त्यांना तुरीपासून काही लाभ होईल असे वाटत होते. या आशेत असतानाच ऐन हिवाळ्यात तुरीचे पीक वाळल्याने यंदा तुरीचे उत्पन्न होईल अशी चिन्हे नाहीत. यातही मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाचा दर ५ हजार ४०० रुपये असताना बाजारात ४ हजार ६०० रुपये व्यापारी देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासनाची खरेदी सुरू नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाने वेळीच तुरीची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.हिंगणघाट व आष्टीत नाफेड खरेदी नाहीजिल्ह्यातच नाही तर विदर्भात लौकीक असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत नाफेडने खरेदी केंद्र नाकारले आहे. या सोबतच आष्टी बाजारातही नाफेडचे केंद्र नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.पी. आपदेव यांनी दिली. हिंगणघाट बाजारात भावाच्या आशेने शेतकऱ्यांची आवक मोठी आहे. या समितीत जर शासकीय खरेदी केंद्र नसले तर या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात नाफेडने खरेदी सुरू होण्यापुर्वीच या भागात केंद्राची मागणी शेतकरी करीत आहेत.तूर खरेदीबाबत नाफेडचा अद्याप निर्णय नाहीनवीन तूर बाजारात येत आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला दरही अत्यल्प आहे. यामुळे शासनाच्यावतीने नाफेडची खरेदी सुरू करणे आता अपेक्षित आहे. शासकीय खरेदी सुरू होताच शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याची अपेक्षा राहील व यातूनच व्यापारी त्यांचे भाव वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नोंदणीकरिता बाजार समितीत केंद्रशासनाने गत हंगामापासून खरेदी आॅनलाईन केल्याने शेतकऱ्यांना नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तसेच प्रयेक बाजार आणि उपबाजार समितीत पणन महामंडळाच्यावतीने केंद्र सुरू करून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे. असे असले तरी तुलनेत शेतकºयांनी नोंदी करण्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे.