शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत मनापासून सहभागी व्हा

By admin | Updated: February 7, 2017 01:12 IST

आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.

श्वेता पालवे : देवळी पंचायत समितीत कार्यशाळादेवळी : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम केवळ शासनाच्या सूचना आणि आपली नोकरी म्हणून पार न पाडता जंतांपासून होणाऱ्या आजारापासून बालाकांना वाचविण्याकरिता आपले कर्तव्य म्हणून राबवा, अशा सूचना गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी केल्या. देवळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. राष्ट्रीय जंतनाशक दिवस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवळी पंचायत समिती येथे सोमवारी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला सहायक गट विकास अधिकारी रूपाली बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सतीश आत्राम यांच्यासह तालुका स्तरीय नोडल शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १० फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींना अल्बेंडाझोलची गोळी देण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देताना डॉ. दिदावत म्हणाले, बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमिदोष हा मातीतुन प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. या जंतांमुळे रक्तक्षयाची लागण होते. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के, ३० टक्के किशोरवयीन मुलामध्ये रक्तक्षय आढळण्याचे प्रमाण असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे भारत सरकार यांनी वर्षातून दोनवेळा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाशा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर १० फेब्रुवारी रोजी १ दिवसीय जंत नाशक गोळी देण्यात येत आहे. यावेळी जंताच्या प्रकाराचीही माहिती देण्यात आली. बालकाची बौद्धीक आणि शारीरिक वृद्धी उत्तम होण्याकरिता त्याच्या शरीरात हे जंत नसणे अनिवार्य असल्याचे यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी तर राष्ट्रीय जंतनाशक दिनाबाबत सहाय गट विकास अधिकारी रुपाली बांगर, गट शिक्षणाधिकारी सतीश आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर यांनी विचार व्यक्त केले. कार्यशाळेला जिल्हा परिषद व खासगी संस्थेतील नोडल शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. त्या शंकाचे निराकरण डॉ. दिदावत यांनी केले. कार्यशाळेचे संचालन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले तर आभार आरोग्य विस्तार अधिकारी प्रमोद लकडे यांनी मानले. कार्यशाळेकरिता तालुका आरोग्य सहय्यक शेख हुसेन, बबीता ताकसांडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ राजू शेलोटे, गोटेकर, पद्मा खरसान, शिरसाट आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)