शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक रजेतून शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:51 IST

विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.

ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावी. पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपिकांना तदर्थ पदोन्नती देण्यात यावी. नागपूर विभागातील महसूल कर्मचाºयांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भरण्यात यावी. पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमीत पदांचा कार्यभार देण्यात यावा. सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी रेटल्या. आंदोलनकर्त्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्त्व महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मानेकर, सरचिटणीस अजय धर्माधिकारी यांनी केले. आंदोलनात अतुल रासपायले, पुनम मडावी, रेणूका रासपायले, रंजना मरघडे, अतुल जाधव, विलास बढे, पुनम वाळूकर, संजय भगत, अभय पवनारकर, अजय लाडे, पद्माकर वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.मागण्यांवर विचार न झाल्यास आजपासून लेखणीबंद आंदोलनमहसूल विभागातील कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय न घेतल्यास लेखणीबंद आंदोलन ११ जुलैपासून करण्यात येणार आहे. याही आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यास १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :Governmentसरकार