शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

By admin | Updated: September 7, 2016 01:08 IST

पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून

शेतकऱ्यांची व्यथा : पाणी आणि ओलिताची सोय असताना पिकांवर येतेय अवकळारोहणा : पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून ओलिताला सुरूवात केली आहे; पण सिंचनाच्या प्रयत्नात भारनियमनाच्या वेळेसह दुरूस्तीसाठी कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाकडून मागेल त्याला वीज, मंगळवारपासून शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा मिळणार, अशा कितीही घोषणा ऐकायला मिळत असल्या तरी विद्युत पुरवठ्याबाबतची वस्तुस्थिती विपरित असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. रोहणा परिसरात आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी रात्री १२ ते सकाळी ९.४५ पर्यंत थ्रीफेज विद्युत पुरवठा असतो. उर्वरित दिवसांत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या काळात विद्युत पुरवठा असतो. इतर वेळी भारनियमन केले जाते भारनियमनाच्या वेळा सोडून इतरवेळी विद्युत पुरवठा नियमितपणे व्हावा, अशी शेतकऱ्यांनी रास्त व निकडपूर्ण अपेक्षा आहे; पण भारनियमन नसलेल्या वेळेतही विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने रोहणा परिसरातील ओलित करण्यास इच्छुक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रात्री विद्युत पुरवठा चालू असला तरी वन्य प्राण्यांच्या हिंसक स्वभावामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने रात्री कुठलाही शेतकरी ओलित करू शकत नाही. या तीन दिवसांत खऱ्या अर्थाने सकाळी ६ ते ९.४५ याच काळात शेतकरी ओलित करतात. भारनियमनाशिवाय इतर वेळीही विद्युत पुरवठा होत नसल्याने ओलितावर विपरित परिणाम होत आहे. किमान नियोजित भारनियमन नसलेल्या वेळेत नियमित व दोषरहित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी ओलित करणारे शेतकरी करीत आहेत. सध्या रोहणा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून दातीर कार्यरत आहेत. ते स्वत: शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांना नियमितपणे विद्युत पुरवठा व्हावा या मानसिकतेचे आहेत. तसा त्यांचा प्रयत्नही असतो; पण कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रत्येक डिपीवर विद्युत पंपाच्या वाढत्या संख्येचे लोड व विद्युतच्या नवीन साहित्यातील कमी टिकावुपणा यामुळे वारंवार होणारे बिघाड तसेच भार वाहून नेणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारा आणि झाडा-झुडूपातून जाणाऱ्या तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड येतो. परिणामी, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, अशी त्यांची खंत आहे. बिघाडाची दुरूस्ती भारनियमनाच्या वेळेत करता येऊ शकत नाही. ती विद्युत पुरवठा सुरू असतानाच खंडित ठेवून करावा लागतो. ती त्या कार्यालय प्रशासनाची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. कारणे काहीही असली तरी शेतकऱ्यांना खंडित विद्युत पुरवठा ओलितदार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ६ सप्टेंबरपासून विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना दररोज १२ तास विद्युत पुरवठा देणार, अशी घोषणा करण्यात आली होती. किमान त्या घोषणेची अंमलबजावणी तरी महावितरणने करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)