लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत सुगंधीत तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला इत्यादी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक करणे २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. असे असताना पिपरी (मेघे) येथील पप्पु मधुकर बाकडे याने राहत्या घरी मशीनद्वारे खर्रा बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चमुने सोमवारी धाड घालून सुगंधीत तंबाखु व खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोन मशीन असा एकूण ४९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पप्पू बाकडे हा त्याच्या राहत्या घरून सुगंधीत तंबाखूचा खर्रा बनवून वितरीत करतो, असे अन्न व औषध प्रशासन वर्धा यांच्या निदर्शनास आले. या माहितीवरून ही कार्यवाही करण्यात आली. अचानक घालण्यात आलेल्या धाडीत खर्चा बनविण्याची दोन मशीन, सुगंधीत तंबाखु, रेस ब्रॅन्डचे ५०० ग्रॅमचे एकूण ५७ पाकिट विक्री करता साठविल्याचे आढळून आले. तसेच पेढीत चार किलो खर्चा आढळून आला. सुगंधीत तंबाखु व खर्चा याचे नियमानुसार नमुने घेऊन उर्वरित सर्व साठा जप्त करण्यात आला.सदरची संपूर्ण कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी, वर्धा ललीत सोयाम व रविराज भो. धाबर्डे यांनी केली.
खर्रा बनविण्याची मशीन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:10 IST
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत सुगंधीत तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला इत्यादी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक करणे २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे.
खर्रा बनविण्याची मशीन जप्त
ठळक मुद्दे४९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला सील : चार किलो खर्रा आढळला