शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

चाऱ्याच्या अभावामुळे दूध उत्पादनात घट

By admin | Updated: February 8, 2016 02:22 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच चाऱ्याचा अभाव, पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत असल्याने दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसते.

चाहुल उन्हाळ्याची : भारनियमनाचाही बसतोय फटकाझडसी : उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच चाऱ्याचा अभाव, पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत असल्याने दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसते. यामुळे गोपालक व दुग्ध उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत.सेलू येथील दोन दुग्ध संस्थांनी झडसी व सभोवतालच्या परिसरात डेअरी सुरू केल्या. त्यांच्यामार्फत हजारो लिटर दूध गोळा केले जाते. शासनापेक्षा या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना अधिक भाव दिला जातो. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले. झडसी व सभोवतलाच्या परिसरातून हजारो लिटर दूध या संस्थेला पुरविले जाते; पण उन्हाचा पारा व वाढत्या पाणीटंचाईमुळे दुधाचे उत्पादन घटले. भारनियमनाचा फटका बसत असल्याने गोपालक संकटात आलेत. नैसर्गिक संकट व नापिकीमुळे शेती व्यवसाय परवडत नाही. यामुळे शेतीला पुरक म्हणून जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय सुरू झाला; पण चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी दुभत्या जनावरांची कमी दरात विक्री सुरू असल्याचे दिसून येते. शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी संकरीत गाई, म्हशी आदी पशुपालन करतात; पण यंदा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकऱ्यांना जनावरे जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोपालकांना चाऱ्याची सोय करून देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)