शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२,९५५ ग्राहकांकडून १.७८ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:44 IST

महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची कार्यवाही : तब्बल २५ पाणीपुरवठा योजनांकडे थकबाकी

आॅनलाईन लोकमतवर्धा : महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे. जिल्ह्यातील तीन विभागात कंपनीकडून तब्बल १ लाख ७८ हजार ५९५ रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती माहिती महावितरणने दिली आहे.थकीत देयकापोटी महावितरणकडून घरगुती, वाणिज्य आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतील थकबाकीदार वीज कापली होती. यात वर्धेतील २५ पाणी पुरवठा योजकांकडून पुरवठा ठप्प करण्यात झाला होता. यात अनेक ग्रामपंचायतींनी वीज कापताच थकीत देयकाचा भरणा केल्याचे सांगण्यात आले आहे.नागपूर परिमंडल कार्यालयाच्या अखत्यारीत येणाºया वर्धा जिल्ह्यात वीज वापरून देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाºया वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडून थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरणे आणि पुनर्रजोडणी शुल्क भरून पुन्हा वीज पुरवठा सुरु करणे असे मोहिमेचे स्वरुप आखण्यात आले आहे. वीज देयकाचा नियमितपणे भरणा करणाºया वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलापोटी ५१ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचा भरणा केला आहे.५.४२ लाख ग्राहक नियमितजिल्ह्यात एकूण ९ लाख ३३ हजार ३६१ वीज ग्राहक आहेत. यातील ५ लाख ४२ हजार ३५० वीज ग्राहक नियमितपणे वीज देयकाचे पैसे भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर उर्वरीत देयकाचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे या मोहिमेत दिसून आले.