शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळातून परस्पर आदरभावाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:34 IST

ऑनलाईन लोकमत वर्धा : कार्यालयीन कामकाजाच्या तणावातून थोडी उसंत मिळावी याकरिता जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे नव्या उत्साहाने कर्मचारी कामाकरिता अग्रेसर राहतील. खेळ भावनेने या स्पर्धा होत आहेत. खेळाच्या माध्यमातून परस्पर आदरभाव निर्माण होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांमध्ये पुन्हा संथ गतीने ...

ठळक मुद्देनितीन मडावी : जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा

ऑनलाईन लोकमत वर्धा : कार्यालयीन कामकाजाच्या तणावातून थोडी उसंत मिळावी याकरिता जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे नव्या उत्साहाने कर्मचारी कामाकरिता अग्रेसर राहतील. खेळ भावनेने या स्पर्धा होत आहेत. खेळाच्या माध्यमातून परस्पर आदरभाव निर्माण होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांमध्ये पुन्हा संथ गतीने का होईना मैदानी खेळाचे महत्त्व अनेकांच्या लक्षात येत आहे, अशा भावना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी व्यक्त केल्या.येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मंचावर जि.प. उपाध्यक्ष कांचनताई नांदुरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती नीता गजाम, मुकेश भिसे, जि.प. सदस्य तथा विरोधी पक्षाचे गटनेते संजय शिंदे, विजय आगलावे यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे खातेप्रमुख व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीतील कर्मचाºयांनी त्यांचे संघ स्पर्धेत उतरविले आहे. खेळाडू व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहने सहभागी झाले आहे. दिवसभर मैदानी स्पर्धा आणि सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येथे आहे. यात अनेक शिक्षकांकडून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होत आहे.तीन दिवस चालणाºया या स्पर्धेत दुसºया दिवशी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जि.प. सदस्य अंकिता होले, राजश्री राठी, विनोद लाखे, नुतन राऊत, शूकेश्वनी धनविज, सुमित्रा मलघाम, प.स.सभापती गंगाधर कोल्हे, महानंदा ताकसांडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारणी अधिकारी डॉ. करुणा जुहीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अध्यक्षांची फलंदाजी अन विरोधकांची गोलंदाजीस्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी क्रिकेट सामन्यात हाती बॅट घेवून फलंदाजी केली. यावेळी विरोधी पक्षाचे गटनेता संजय शिंदे यांनी गोलंदाजी केली. गोलंदाजी दरम्यान टाकलेले चेंडू ‘वाईड बॉल’ पडले असता अध्यक्षांनी फलंदाज पाहून बॉलर भिले, असे म्हणताच नंतरचा चेंडू यष्टीवर आला. तो अध्यक्षांनी तसाच टोलावला. तो सहा रनसाठी गेला की चार, हे मात्र माहीत नसल्याचे अध्यक्ष मडावी म्हणाले.