शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्याचे केले बोअरवेलमध्ये पुनर्भरण

By admin | Updated: June 29, 2016 02:13 IST

आठ ते दहा वर्षांपूर्वी प्रा. विवेक देशमुख यांनी सावंगी (मेघे) येथे घर बांधायला सुरुवात केली. घराच्या अंगणात बोअरवेल केली; पण एक वर्षातच ती आटली.

सावंगी (मेघे) येथील प्रयोग : पहिली बोअरवेल आटल्याने दुसरी खोदून केली उपाययोजनावर्धा : आठ ते दहा वर्षांपूर्वी प्रा. विवेक देशमुख यांनी सावंगी (मेघे) येथे घर बांधायला सुरुवात केली. घराच्या अंगणात बोअरवेल केली; पण एक वर्षातच ती आटली. परिसरात एकमेव घर असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे दुसरी बोअर करावी लागली. हे करीत असतानाच आता पाणीटंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी उपाययोजना केली. छतावरील पावसाचे पाणी आणि वाया जाणारे पाणी जुन्या आटलेल्या बोअरमध्ये सोडत पुनर्भरण केले. यातून त्यांनी जलमित्राची भूमिका साकारली.कृषी शास्त्राचे शिक्षक असल्याने पाण्याचे नियोजन व पूर्तता कशी करावी, हे प्रा. विवेक यांना कळत होते. अंगणातील बोअर आटल्याने दुसरी बोअरवेल खोदणे गरजेचे होते. त्यांनी दुसरी बोअरवेल केली; पण हे करूनच ते थांबले नाही तर पावसाचे छतावरील पाणी पाईपद्वारे एकत्र करून ते जुन्या १५० फुट बोअरवेलमध्ये सोडले. यामुळे वर्षभर पडणारे पावसाचे छतावरील आणि अंगणातील सर्व पाणी जुन्या बोअरवेलमध्ये जाते. परिणामी, गत सात-आठ वर्षांत प्रा. देशमुख यांच्या दुसऱ्या बोअरवेलचे पाणी कधीही आटले नाही. हा प्रयोग पाहून सावंगी (मेघे) येथील सर्व नागरिकांनीही भूजल पुनर्भरणाचा प्रयोग आपापल्या घरी राबविला आहे. यातून सावंगी (मेघे) येथे छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याची एकप्रमारे चळवळच सुरू आहे. शिवाय एक व्यक्ती एक झाड ही मोहिमही येथील नागरिकांच्या साह्याने राबविण्यात येत आहे. स्वत:चा आॅक्सीजन व स्वत:चे पाणी, याची व्यवस्था आपण स्वत: करण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रा. देशमुख यांनी ही बाब लक्षात घेतल्याने सावंगी येथे रेन वॉटर हार्वेस्टींगचे महत्त्व नागरिकांनाही कळले आहे. मुख्यत: नवीन घर बांधले जात असताना ते तेथे जातात. खर्चात खर्च होऊन जातो, असे समजावून सांगत त्यांच्याकडून रेन वॉटर हॉर्वेस्टींगचा प्रयोग करून घेतात. यात ९० टक्के लोक समर्थन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वत:पासून सुरू झालेला रेन वॉटर हार्वेस्टींगचा हा प्रयोग आता एक चळवळ होत असून खरे जलमित्र घडविले जात असल्याचेच दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)