शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यावर अन्याय झाल्यास मानवाधिकार आठवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:56 IST

मानवाचे मुलभूत अधिकार समजून घेत प्रशासनात काम केले तर अधिकारी संवेदनशीलपणे काम करू शकतात. अधिकारी असताना आपल्याला मानवाधिकार आयोगाची आठवण येणार नाही; पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो व त्याला कुठूनच न्याय मिळण्याची आशा नसते, त्यावेळी त्या व्यक्तीला मानवाधिकार आयोगाची आठवण येते, ....

ठळक मुद्देएस. जलाजा : जलयुक्त शिवारचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानवाचे मुलभूत अधिकार समजून घेत प्रशासनात काम केले तर अधिकारी संवेदनशीलपणे काम करू शकतात. अधिकारी असताना आपल्याला मानवाधिकार आयोगाची आठवण येणार नाही; पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो व त्याला कुठूनच न्याय मिळण्याची आशा नसते, त्यावेळी त्या व्यक्तीला मानवाधिकार आयोगाची आठवण येते, असे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य एस. जलाजा यांनी मानवाधिकार आयोगाचे महत्त्व विषद करताना व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, समाजकल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, सांख्यिकी अधिकारी सविता मुळीक, समाजकल्याण अधिकारी अविनाश रामटेके उपस्थित होते.त्या पूढे म्हणाल्या की, वर्धा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे काम करताना प्रशासनाने महात्मा गांधींची मूल्ये समाजात रूजविण्यास्तव काम करावे. त्यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या आधारे विकास कामे केल्यास ती महात्म्याला मोठी श्रद्धांजली ठरेल. जिल्हा अशा विकास कामांमुळे रोलमॉडेल म्हणून समोर येईल. मनरेगामध्ये महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाचे उत्तम काम केले आहे. जलयुक्त शिवार ही चांगली योजना राबविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाने सिंचन सुरक्षितता उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकºयांचा फायदा होत आहे. आरोग्य सुविधांचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, कुपोषणाच्या तीव्र व मध्यम गटातील बालकांच्या घरी आरोग्य अधिकाºयांनी भेट द्यावी. त्या कुटुंबाचे उत्पन्न व त्यांचा आहार याचा अभ्यास करावा. म्हणजे कुपोषणाावर नेमका उपाय करता येईल. सर्व प्राथमिक आरोग्य कंद्रांत स्वच्छ शौचालयाची गरज त्यांनी प्रतिपातिद केली. जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९३१ असले तरी याची आकडेवारी तालुका व ग्रा.पं. निहाय गोळा करावी, अशा सूचना देत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचाही आढावा घेतला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalyukt Shivarजलयुक्त शिवार