शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी घर गाठत दिली शिधापत्रिका

By admin | Updated: October 10, 2015 02:39 IST

येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

‘त्या’ शेतकरी कुटुंबावर मदतीचा ओघ : वर्धेच्या युवकांनी दिला किराणा व धान्य वायगाव (निपाणी): येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाने दोन दिवस वरणाचे पाणी पिवून काढले. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उजेडात आणताच त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. शुक्रवारी वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी शेतकऱ्याचे घर गाठत त्याला अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. तत्पूर्वी सकाळीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत केली. तर वर्धेतील काही युवकांनी या शेतकऱ्याचे घर गाठत किराणा व धान्याची मदत दिली. शिवाय वेळ प्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या नावे शेताचा सातबारा नसल्याने त्याला शासकीय मदत मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या घराकडे कुणीही फिरकले नाही. शिवाय या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळाले नव्हते. याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळताच अधिकाऱ्यांसह काही समाजिक संघटनांनी या शेतकऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यात तहसीलदार राहुल सारंग, नायब तहसीलदार प्रिती डुडूरकर यांनी शेतकऱ्याच्या घराला भेट देत अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. यावेळी सरपंच गणेश वांदाडे व जि.प. सदस्य मिना वाळके यांची उपस्थिती होती. कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जवळेकर, शेळके व मेघे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत या कुटुंबाची विचारपूस केली. सोबतच त्यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ही रक्कम शेतकऱ्याच्या मुलीच्या स्वाधीन करण्यात आली.(वार्ताहर)