शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या किमती भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 14:04 IST

२०१९-२० चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्र्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत.

ठळक मुद्देकंपन्यांकडून भरघोस वाढ शेतीचा वाढेल उत्पादन खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१९-२० चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्र्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.खताबरोबरच मजुरी, विद्युत खर्च यावरही वाढणारा खर्च लक्षात घेता २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, ही शासनाची घोषणा दिवास्वप्नच ठरणार असे दिसते. शेतमालाचे भाव आहे तसेच आहेत. वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतो, असा दरवर्षीचा अनुभव असतो. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा बाजारात त्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असतात. शासनाची हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था नसते. शेतकरी अधिक वेळ थांबू शकत नाही. परिणामी, मिळेल तो भाव घेऊन शेतकरी आपला माल विकतो. खतांबरोबरच मजुरीचे दरदेखील वाढत आहेत.वीज देयकाचे दर नुकतेच ६ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. एकीकडे शेतीवरील खर्चात वाढ होत आहे. म्हणजेच उत्पादन खर्च वाढत आहे. भाव ‘जैसे थे’ असल्याने उत्पन्न दरवर्षी घटत आहे. शासन २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायची भाषा करीत आहे. शासनाचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अशी झाली दरवाढ रासायनिक खतांच्या किमतीत हंगामापूर्वीच १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०:२६:२६ खताची ५० किलोची बॅग १३२५ पर्यंत मिळायची. ती आता १३४० रूपयाला घ्यावी लागणार आहे. यात १०५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. डीएपीची बॅग १२९० रुपयांऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रूपयाने भाव वाढले आहेत. तर पोटॅशची बॅग ७०० रुपयांवरून थेट ९०० रुपये किंमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमती देखील १०० ते २५० रूपयांनी वाढल्या आहे.

टॅग्स :agricultureशेती