शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वर्धेत आढळला दुर्मिळ ‘सर्वाशनी’ गिधाड

By admin | Updated: November 11, 2016 01:52 IST

निसर्गात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले, निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षांच्या सर्वच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

पर्यावरणाचा सफाई कामगार : बहार नेचर फाउंडेशनने केली नोंद वर्धा : निसर्गात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले, निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्षांच्या सर्वच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विदर्भातूनही गिधाडांचा जवळ जवळ सफाया झाला असताना काल बुधवारी एन्व्हारमेंटल रिसर्च आणि कन्झर्वेशन सोसायटी तसेच बहार नेचर फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य पराग दांडगे यांनी सर्वाशनी गिधाडाची वर्ध्यात नोंद घेतली. विस्तीर्ण विदर्भात क्वचितच आढळणारा सर्वांशनी गिधाड पक्षी हाडफोडी गिधाड म्हणूनही ओळखल्या जातो. अगदी लहान आकाराची हाडेसुद्धा चोचीने उचलून ती गडांवर आपटून फोडून त्यातील मगज खाण्यात या पक्षांचा हातखंडा असल्याचे पक्षीमित्रांकडून सांगण्यात आले आहे. मातकट करड्या रंगाच्या या गिधाडाचा आकार गिधाडांच्या इतर प्रजातीपेक्षा लहान असतो. चोच व डोळे पांढरे किंवा पिवळे असतात. हाडफोडी गिधाडाचे मूळ अस्तित्त्व युरोप, आफ्रिकेत असून ते अमेरिका खंडातही आढळतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन आॅफ नेचरने सर्वाशनी गिधाडाला संकटग्रस्त पक्षी प्रजाती म्हणून घोषित केले आहे. जगभरात या गिधाडाच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.पवनचक्कीच्या पात्यामध्ये होणारे अपघात, अन्नाची कमतरता, वास्तव्य ठिकाणांची कमतरता, विषप्रयोग, गुराढोरांवर होणारा डायक्लोफिन्याक या वेदनाक्ष्यामग इंजेक्शनचा अतिवापर, शेतात किटकनाशकांचा अतिवापर अशा समस्यांना तोंड देत गिधाड पक्षी अस्तित्वाची लढाई लढत आहेत. येत्या २० ते २५ वर्षांत एकही गिधाड शिल्लक न राहिल्यास आपल्याला नवल वाटू नये.शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे, चाऱ्यामार्फत त्यातील विषारी घटक गुराढोरांच्या शरीरात जातात, अशी जनावर दगावल्यावर गिधाडांनी खाल्ल्यास ती विषारी तत्वे गिधाडांच्या अड्यांना ठिसूळ बनवितात, अशी अंडी परिपक्व होण्याआधीच फुटतात. ज्यांचा थेट परिणाम प्रजननावर होऊन संख्या रोडावत आहे. विदर्भात दुर्मिळ असणाऱ्या या गिधाडांच्या मोजक्याच नोंदी उपलब्ध असून वर्ध्यात २००७ मध्ये पराग दांडगे यांनीच त्याची नोंद घेतली होती. या दुर्मिळ पक्षाच्या नोंदीमुळे वर्धेतील पक्षीमित्र सुखावले असून बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखेडे, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, रवींद्र पाटील, जयंत सबाने, वैभव देशमुख, दिलीप विरखडे व राहुल तेलरांधे इत्यादींनी आनंद व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी) विषारी औषधांच्या वाढत्या वापरामुळे प्रजात धोक्यातशेतकऱ्यांकडून मध्यंतरी व आजही विषारी औषधांचा वापर वाढविला आहे. या विषाची बाधा झाल्याने जनावरांचा मृत्यू होतो. या जनवरांचे मांस खाण्यात आल्याने या गिधाडांनाही जीव गमवावा लागत आहे.