शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात रापमला 1.76 कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा राज्य परिवहन महामंडळासाठी व्यावसायिक हंगामच असतो. पण ऐन दिवाळीपूर्वी रापमच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने आणि मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रामपच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये बसेस उभ्या आहेत. परिणामी, आतापर्यंत रापमला १.७८ कोटींचा फटका बसला आहे.लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी परततात. दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

या मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन-    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे.-    राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा.-    एसटी कामगारांना समान काम-समान दाम या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८ हजार रुपये मूळ वेतन देण्यात यावे.-    सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

दररोज ८०० बस फेऱ्यांचे नियोजन-    जिल्ह्यातील रापमच्या पाच आगारांमध्ये एकूण २२० बसेस आहेत. या बसेसच्या जोरावर पाचही आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते; पण कामबंद आंदोलनामुळे रापमचे हे सर्व नियोजन कोलमडले आहे.

मालवाहतुकीवरही परिणाम-    कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान रापमकडून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतुकीच्या माध्यमातून मोठी मिळकतही रापमला मिळत असली तरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मालवाहतूक करणारी वाहनेही सध्या रापमच्या आगारांमध्ये उभ्या आहेत. एकूणच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रापमच्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.दररोज २३ लाखांची मिळकत-    रापमच्या पाच आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असून २२ लाखांची प्रतिदिवशी मिळकत होते. तर हंगामात ही मिळत किमान ३५ लाखांवर जात असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी मागील आठ दिवसांपासून रापमच्या वर्धा विभागाला कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तोटाच सहन करावा लागत आहे.

रामपच्या वर्धा विभागाला दररोज २३ लाखांची मिळकत राहत असून हंगामात ती किमान २३ लाखांवर पोहोचते. पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने रापमला किमान १.७६ कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.- विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रापम, वर्धा

 

टॅग्स :state transportएसटी