मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : ३० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरतवर्धा : सेलू येथील यशवंत विद्यालय येथील मुख्याध्यापक रंजना दाते यांना मुंबई येथील विशेष समारंभात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या २०१५-१६ या वर्षीच्या राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुस्कारांनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील १०९ शिक्षकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते गौरव करण्यात आला.गुरूवारी झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे, खा. अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहुल नार्वेकर, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धीरज कुमार, संचालक नामदेव जरग, गोविंद नांदेडे आदी मान्यवर उपस्थित होते. रंजना दाते या मागील ३० वर्षांपासून शिक्षकी पेशात आहेत. यावेळी दाते यांना रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात रंजना दाते यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)
रंजना दाते राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
By admin | Updated: October 17, 2016 01:07 IST