शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

सार्वजनिक बांधकाम विभागात रंगली ओली पार्टी

By admin | Updated: April 30, 2015 02:01 IST

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात कार्यरत अभियंता हा बसस्थानकावर रात्री ९ वाजता

तळेगाव (श्या.पंत) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात कार्यरत अभियंता हा बसस्थानकावर रात्री ९ वाजता मद्यधुंद अवस्थेत बेशुद्ध पडून असल्याचे शुक्रवारी प्रवासी व नागरिकांना आढळून आले. प्रवाश्यांनी त्यांना हटकले असता ते वर्धेकडे निघून गेले. त्यामुळे येथे नेहमीच दारूच्या ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे बोलल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात येथील अभियंत्यांना शुक्रवारी मार्च एंडिंगच्या नावाखाली एका ठेकेदाराने ओली पार्टी दिली. यामध्ये एका शाखा अभियंत्याने यथेच्छ मद्यप्राशन केले आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धुंदीतच ते बसस्थानकावर आले व तेथेच बेशुद्ध झाले. नागरिकांनी हटकले असता ते निघून गेले. पण हा प्रकार येथे नित्याचाच झाला असल्याचे नागरिक सांगतात. बांधकाम विभागात कोट्यवधींची कामे सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराकडून वारेमाप कमिशन उकळल्या जात असल्याने कामेही निकृष्ठ दर्जाची होते आहेत. बांधकाम विभागाचे विश्रामगृह विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नाही. शाखा अभियंता हरीश परमार हे वर्ध्यावरून तर उपअभियंता नरेश लभाणे हे नागपूरवरून ये-जा करतात. कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्या नेहमीच आढळतात. महिनाभरात १४ दिवस ओली पार्टी झाल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.(वार्ताहर)