शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रामनाम जयघोषाने दुमदुमणार घोराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:02 IST

विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे.

ठळक मुद्देपावणे दोनशे वर्षांची परंपरा : यात्रा महोत्सवाला प्रारंभ

आॅनलाईन लोकमतघोराड : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे.संत केजाजी महाराज व त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनी सुरू केलेल्या धार्मिक प्रथा, परंपरा आजही जोपासल्या जात आहे. गुढी पाडवापासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो. याच दिवसापासून तर द्वादशीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. २५ मार्च रविवारी दुपारी १२ वाजता गुलालाची उधळण, हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. यावेळी श्रीराम जन्मोत्सवावर डॉ. आवारी महाराज यांचे कीर्तनही आयोजित करण्यात आलेले आहे. याच रात्री १० वाजता भजनी दिंड्यांसह रथ मिरवणूक गावातील पालखी मार्गाने निघणार आहे. या रथावर हनुमंताची मूर्ती विराजमान राहणार आहे.परंपरेनुसार रथावर दोन मशालधारी राहत असून हा मान नक्षीणे परिवाराला आहे. विलास नक्षीणे व प्रदीप नक्षीणे हे रथावर मशाल घेऊन राहतात. हा रथ लाकडी असून भाविकांच्या साह्याने ओढला जातो. या महोत्सवाला दूरवरून भाविक येत असल्याने घोराड येथे भाविकांची पाच दिवस गर्दी उसळणार आहे. मंदिरावर करण्यात आलेला विद्युत रोषणाईचा झगमगाट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.संत केजाजी व संत नामदेव महाराज यांच्याप्रती श्रद्धा असणारे विदर्भातील असंख्य भाविक श्रीराम नवमी उत्सवानिमित्त घोराड गावात दाखल होत आहेत. या भाविकांच्या स्वागतासाठी घोराड नगरी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. येथील विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती असते. राम जन्मोत्सवातही भाविकांचा मळाच येथे फुलणार असल्याचे दिसते.विविध धार्मिक कार्यक्रम२५ मार्च रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ रामजन्मोत्सवानिमित्त कीर्तन, सोमवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत डॉ. आवारी महाराज यांचे काल्याचे कीर्तन, सायंकाळी ५ वाजता गो-माता मंदिरावर दहीहांडी कार्यक्रम, २७ रोजी एकादशी निमित्त भजन, जागर, २८ रोजी पारंपरिक फुगड्यांचा कार्यक्रम होणार आहे.