स्वर-ताल संगत परिवाराचा उपक्रम : जिल्हा ग्रथालयात रंगला संगीत महोत्सववर्धा : शास्त्रीय संगीत व त्यावर आधारित हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण, अशी रसिकांना मोहिनी घालणारी मैफल स्वर-ताल संगत परिवाराद्वारे स.ब. सार्वजनिक जिल्हा गं्रथालयाच्या सभागृहात पार पडली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीला रसिकांनीही दाद दिली. ‘भोर आयी गया अंधियारा’ या बावर्ची चित्रपटातील गीताने मात्र रसिकांना माहिनीच घातली.तबला नवाज उस्ताद लड्डूमियॉ खॉ, प्रा. दिलीप राऊत, प्रभाकर बावसे, डॉ. विनोद देऊळकर, भाग्यश्री सरोदे यांच्या स्मृत्यर्थ आयोजित संगीत महोत्सवात अनघा पांडे रानडेसह आराधना संगीत विद्यालयाचा गायकवृंद सहभागी झाला होता. मैफलीची सुरूवात अल्हैया बिलावल रागाची छोटेखानी पेशकश आणि ‘भोर आयी गया अंधियारा’ या बावर्ची चित्रपटातील गीताने झाली. त्या पाठोपाठ खमाज रागातील तराणा व त्यावर आधारित ‘आली कुुठुनशी कानी’ हा अभंग, मरवा रागाचे सूरमणी वसंत जळीत यांनी व्हायोलीनवर छेडलेले स्वर आणि समूह स्वरातील ‘मावळत्या दिनकरा’ हे भावगीत, नरेंद्र माहुलकर यांनी संवादिनीवर काफी रागाची स्वरावली आणि ‘जलते है जिसके लिये’ हे सिनेगीत सादर केले. आसावरी रागातील ‘कैसा जाूद बलम तुने डारा’ भैरव रागाचे जागते रहो चित्रपटातील प्रभातगीत ‘जागो मोहन प्यारे’ सादर करण्यात आले. सोबतच यमन रागातील सरगम सादर करून ‘तुम आशा विश्वास हमारे’ या प्रार्थना गीतापासून तर ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ या कव्वालीपर्यंत अनेक गीतांची मालिकाच गायक-गायिकांनी सादर केली. तोडी रागातील ‘भिनी भिनी भोर आयी’, पूर्वी रागातील ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे भावगीत सादर झाले. मैफलीची सांगता विद्यार्थिनींनी भैरवी रागातील छोटा ख्याल प्रस्तुत करीत ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या भजनाने केली.कार्यक्रमात अविनाश काळे यांच्या हस्ते शारदा संगीत विद्यालयाचे संचालक सुरेश चौधरी व युवा गायिका मानसी हेडाऊ यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर ज्येष्ठ संगीतकर्मी प्रा. जयंत मादुस्कर, अनघा रानडे, ग्रंथालय सचिव गौरीशंकर टिबडेवाल उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश बावसे यांनी तर मानपत्राचे वाचन संगीता इंगळे यांनी केले. संचालन सुनील रहाटे यांनी केले तर आभार मंगेश परसोडकर यांनी मानले. मैफलीला श्याम सरोदे, रवी खाडे, जीवन बांगडे, राम वानखेडे यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
‘भोर आयी गया अंधियारा’ने रसिक मोहित
By admin | Updated: December 23, 2015 02:50 IST