शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘राजीव गांधी निवारा-२’ योजना बारगळली

By admin | Updated: June 25, 2014 23:54 IST

राज्य शासनाने गरिब कुटुंबासाठी इंदिरा गांधी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. यातून सर्वांना घरकूल मिळणे शक्य नव्हते म्हणून सोबतीला राजीव गांधी निवारा-२ योजना अंमलात आणली़ प्रारंभी

बँकांची मंजुरीला बगल : अडीच वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील प्रकरणे धूळ खातअमोल सोटे - आष्टी (श़)राज्य शासनाने गरिब कुटुंबासाठी इंदिरा गांधी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. यातून सर्वांना घरकूल मिळणे शक्य नव्हते म्हणून सोबतीला राजीव गांधी निवारा-२ योजना अंमलात आणली़ प्रारंभी दोन-तीन वर्षे प्रकरणे बँकांमार्फत मंजूर झालीत; पण अडीच वर्षांपासून बँकांनी प्रकरणे मंजूर केली नाहीत़ यामुळे ही योजना बारगळल्याचे दिसून येते़इंदिरा आवास योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, रमाई घरकूल योजना यातून दारिद्र्य रेषेखालील हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळाले; पण अल्प उत्पादन घेणाऱ्या नागरिकांना स्वत:चे पक्के घर बांधता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २००८ मध्ये सुधारीत राजीव गांधी निवारा २ योजना अंमलात आणली़ या योजनेत बीपीएल, अंत्योदयची अट नसल्याने सर्वसामान्यांसाठी चांगली योजना म्हणून लौकीकप्राप्त ठरली. शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे सहकार्य घेतले.प्रत्येक लाभार्थ्यांला बँकेकडून ९० हजार व १० हजार लाभार्थी हिस्सा, कर्जाऊ रूपाने देऊन १० वर्षांत बिनव्याजी परतफेड करायची आहे. कर्जाऊ रकमेवरील व्याज मात्र लाभार्थ्यांना माफ होते. कल्याणकारी योजना असल्याने नागरिकांच्या पसंतीस उतरली होती. यामुळे कागदपत्र गोळा करून ग्रा़पं़ मार्फत पंचायत समितीला व तेथून बँकेत जाण्याचा प्रवास सुलभ झाला होता. हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेऊन रितसर हप्ता भरणे सुरू केले होते; पण अडीच वर्षांपूर्वी शासनानेच राजीव गांधी निवारा - २ योजना गुंडाळून ठेवली आहे. प्रकरण मंजूर झाले काय, हे जाणून घेण्यासाठी लाभार्थी बँकेच्या चकरा मारतात; पण अधिकारी उत्तर देत नाहीत़ लोकप्रतिनिधी याविरूद्ध आवाज उठवत नाहीत़ राजीव गांधी निवारा-२ या योजनेमधून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी बँकेचे हस्ते अदा केलेत; पण त्यांच्या कर्जावरील व्याज अद्याप शासनाने बँकेला दिले नाही. सदर व्याज लाभार्थ्यांच्या नावावर आजही कायम आहे. शासनाचे अधिकारी चांगल्या योजनांची कशी वाट लावतात, हेच या योजनेतून दिसून येते़ राजीव गांधी निवारा-२ योजनेसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण ५ हजार ३५४ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ७३५ प्रकरणे मंजूर करण्यात आली होती़ उर्वरित लाभार्थी आजही लाभ मिळेल, अशी भाबडी आशा बाळगून आहेत़ नागरिकांना हक्काचा निवारा बांधून देण्याऐवजी योजनाच बंद करून दिशाभूल केली जात असल्याचे सध्या दिसून येत आहे़ ही योजना दोन वर्षांकरिताच राबविण्यात आल्याची माहितीही पूढे आली आहे़ मग, या योजनेतून आपल्याला घर बांधता येईल, अशी आशा उराशी बाळगून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घर मिळणारच नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शासनाने लाभार्थ्यांची मोठी यादी लक्षात घेता ही योजना पून्हा सुरू करावी, अशी माणगीही लाभार्थ्यांतून होत आहे़