शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पैशाच्या वादातून राजेश उईकेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतचा राग प्रशांतच्या मनात होताच.

ठळक मुद्देआरोपी अटक : चाकूने केल्या २१ गंभीर जखमा, जुगारात पैसे जिंकल्यानंतर झालेला वाद गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धारदार शस्त्राने वार करून आदिवासी कॉलनी येथील राजेश उईके (३६) याची हत्या करण्यात आली. सदर प्रकरणातील आरोपीला रामनगर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली असून पैशाच्या वादातून राजेशला चाकूने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम, असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याने चाकूने राजेशच्या अंगावर चक्क २१ घाव घालून त्याच्या शरीराची चाळणीच केली.पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतचा राग प्रशांतच्या मनात होताच. अशातच जुगारात राजेश सुमारे १ हजार ५०० रुपये जिंकला. ही रक्कम त्याच्या जवळ असल्याचे लक्षात येताच पैशाच्या कारणावरून आरोपीने त्याच्याशी वाद केला. यावेळी आरोपी प्रशांत तुमडाम याने जवळ असल्या चाकूने राजेशवर सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला.सदर घटना उघडकीस येताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून गुन्ह्याची नोंद घेतली. घटनेच्या दिवशीपासून राजेशचा आरोपी पसार होता. त्याला रामनगर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. शिवाय, अटकेतील आरोपीची १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, रामनगरचे ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक शंकर भलावी, धर्मेंद्र अकाली, संतोष कुकडकर, नीलेश करडे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज तेलगोटे करीत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान अटकेतील आरोपी आणखी काय कबुली देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नातेवाईकांच्या घरी घेतला होता आश्रयराजेश उईके याची हत्या करून घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीने जिल्ह्याबाहेर पलायन केले. इतकेच नव्हे, तर आरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम याने त्याचा मोबाईलही स्वीच आॅफ केला होता. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या चमूने नागपूर गाठून गवळीनगरातातून प्रशांतच्या नातेवाईकाच्या घरून त्याला ताब्यात घेतले.मुलीला पाहणे राहून गेलेमृतक राजेश उईके याला नऊ दिवसांची एक मुलगी आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी प्रसुतीकरिता माहेरी गेली होती. तिने गोंडस अशा एका मुलीलाही जन्म दिला. तिचा चेहराही घटनेच्या दिवशीपर्यंत मृत राजेशने बघितले नव्हता. अशातच राजेशची हत्या करण्यात आल्याने त्याचे मुलीचा चेहरा पाहणे राहून गेले, हे विशेष.गुन्ह्यातील चाकू अन् रक्ताने माखलेले कपडे जप्तआरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम याच्याकडून रामनगर पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहे.चार वर्षांपूर्वीही झाला होता वादमृत राजेश व आरोपी प्रशांत यांच्यात चार वर्षांपूर्वी क्षुल्लककारणावरून वाद झाला होता. त्यावेळी चांगलीच मारहाण झाली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.मृताच्या शरीराची केली चाळणीआरोपी प्रशांत याने निर्दयतेचा कळस गाठून राजेश याच्या शरीरावर चाकूने वार केले. मृतकाच्या छाती, पोट, कुशी, पाठीवर एकूण तब्बल २१ घाव केले. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला होता; पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचाराजेश उईके (३६) हत्या प्रकरणात अटक केलेला आरोपी प्रशांत उर्फ पप्पू तुमडाम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे पुढे आले आहे.त्याच्यावर यापूर्वी भादंविच्या कलम ४३६ अन्वये गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Murderखून