शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, शेतमजूरही चिंतेत

By admin | Updated: July 8, 2015 02:21 IST

पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे.

कामासाठी भटकंती : सर्वांनाच पावसाची प्रतीक्षाआकोली : पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे. तसेच मुलांच्या शाळा सुरू झाल्याने त्यांचा खर्च कस करावा हा प्रश्नही त्यांंना सतावत आहे. मृग नक्षत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजासह शेतमजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणी व पेरणीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. दिले. सर्वत्र शेतशिवारांमध्ये कामांची लगबग सुरू असल्याने सर्वत्र शेतांमध्ये काम करणारे मजूर दिसत होते. पण पेरण्या आटोपताच पावसाने दडी मारली. आज बरसेल, उद्या येईल ही आस लावून शेतकरी व शेतमजूर आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. पण पधरवड्यापासून ढगातून टिपूसभर थेंब ही जमिनीवर पडला नाही. चार-पाच दिवसांपासून ढग नुसतेच वाकुल्या दाखवित आहे. पाऊस नसल्यामुळे रिकामपण म्हणून शेतकऱ्यांनी पिकाला आलटुन-पालटुन डवरणी केली. त्यामुळे शेतात तण वाढले नाही. निंदण व खुरपणाची कामे थांबली. पाऊसच नाही तर रासायनिक खत तरी कसे देणार. त्यामुळे मजूरवर्गाला कामच नाही. मजुरी नसल्यामुळे हातात पैसा नाही. अन्न-धान्य घरात असले तरी तिखट, मीठ, तेल, भाजी कसे विकत घेणार हा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बळीराजा तर मोठ्याच कात्रीत सापडला आहे. पाऊस येत नाही. विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली, विजेचा खेळखंळोबा सुरू आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोपटी किती दिवस तग धरुन राहणार हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसाठी ‘बुरे दिन’ आल्याचे बोलल्या जात असून मजुरांना पावसाची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)