शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:58 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

ठळक मुद्दे२५.५५ टक्के पाऊस कमी : यंदा केवळ ५२५.९४ मि.मी पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. जिल्ह्यातील धरणे व नदी, नाले सध्या रिकामेच असून पावसाळा निघून जाण्याची परिस्थितीत असताना अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे.२३ आॅगस्ट पर्यंत गेल्या वर्षी वर्धा तालुक्यात ८४१.१० मि.मी., सेलू येथे ६८२.४०, देवळी ८५८, हिंगणघाट ९११, समुद्रपूर ६७२.६०, आर्वी ७३८.९०, आष्टी ७४०, कारंजा ६४०.५० मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ६०८९.१० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला होता. तो ७६१.१४ च्या सरासरीने होता. २३ आॅगस्ट पर्यंत ८२.८७ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५७.१२ टक्केच पाऊस झाला आहे. वर्धा तालुक्यात ५१८.९०, सेलू ५७७.४०, देवळी ५२४.६०, हिंगणघाट ५६७.९१, समुद्रपूर ५४९.६०, आर्वी ५३५.०४, आष्टी ४०३.८०, कारंजा (घा.) तालुक्यात ५३०.३० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत यंदा ५२५.९४ च्या सरासरीने ४२०७.५५ मि.मी. पाऊस झाला असून तो ५७.१२ टक्के आहे.जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच नदी, नालेही अद्याप कोरडेच आहे. त्यामुळे शेतीला भविष्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. गावातील जलस्तोत्र अद्यापही कोरडेच असून पिण्याच्या पाण्याचे संकट बिकट होईल.भाजीपाला उत्पादकांनाही फटकायंदा अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. कपाशी व सोयाबीन ला अशा स्वरूपात पाणी दिले जात आहे. सतत उष्णतामान वाढत असल्याने पीक जगविणे शेतकºयांसाठी अडचणीचे आहे.