शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’

By admin | Updated: May 29, 2017 01:10 IST

शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली.

खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित : झाडे कोसळल्याने वाहतूकही प्रभावित लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली. पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. शहरात सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. तब्बल अर्धा ते एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. तळेगाव (श्य.पं.) परिसरात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वादळासह पाऊस आला. यामुळे रस्त्यावरील व गावातील झाडे कोसळली. जुन्या वस्तीतील काही घरांवरील टिना उडाल्या. यात जीवित हानी झाली नाही. काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे भुईमुंग पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. आष्टी शहरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वीज तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला आहे. कारंजा तालुक्यात सेलगाव (लवणे) परिसरात खैरी (टॉवर) येथील शेखर पठाडे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. छप्पर उडाल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली; पण सायंकाळपर्यंत पंचनामा झाला नव्हता. समुद्रपूर तालुक्यात नारायणपूर परिसरात शनिवारी दुपारी वादळी वारा व पावसाने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले. पाठर येथील १० ते १५ घरावरील टिनपत्रे उडाल्यात. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंजी (मोठी) व सेवाग्राम वादळी वारा आणि पावसाचे आगमन झाले. पवनार येथे पाऊस नसला तरी वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. यामुळे नुकसान झाले. कुठे विद्युत खांब कोसळल्यामुळे तर कुठे वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळ रविवारी सायंकाळी हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्याचे तांडव सुरू होते. सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्याने थैमान घातल्यानंतर शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाले नसून पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. समुद्रपूर तालुक्यात रविवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शिवाय देवळी शहरासह तालुक्यातील पुलगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पावसामुळे उकाडा मात्र कमी झाल्याचे जाणवत होते.