शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा टक्का घटला, प्रकल्प तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:35 IST

समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे.

ठळक मुद्दे२७.७९ टक्के घट : उद्योगासह खरीप, रबी हंगामाला पाणी देणे होणार कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. परिणामी, सरासरी पावसाचा टक्का घटला आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के सरासरी पाऊस झाला होता; पण यंदा केवळ ४७.६० टक्के पावसाची नोंद झाली. मागील वर्षीपेक्षा तब्बल २७.७९ टक्के पाऊस कमी झाला आहे. सध्या कडक उन्ह तापत असल्याने जलाशयांची स्थिती ढासळणार असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावसाचे बºयापैकी आगमन झाले. आॅगस्ट महिन्यापर्यंत जलाशयांनी ५० ते ६० टक्के पातळी गाठली होती. पिकांचीही स्थिती सोयाबीन वगळता बºयापैकी होती; पण यंदा सध्या पिकांची स्थिती चांगली असली तरी पाऊस मात्र बेपत्ता आहे. यावर्षी मान्सून चांगला राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रारंभी तशी वातावरण निर्मितीही झाली; पण पावसाचा खंड कायम राहिला आहे. खरीप हंगामात उशीरा का होईना; पण बºयापैकी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. यानंतर काही दिवस पावसाचे सातत्य तथा ढगाळी वातावरण कायम होते; पण आता मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ताच झाला आहे. उन्हाळ्यागत उन्ह तापू लागले आहे. उघाड मिळाल्याने शेतातील डवरणी, निंदणाची कामे उरकली जात आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास काही भागातील पिकांची वाढ खुंटणार असल्याचे सांगितले जात आहे.मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण ५,४४३.२० मिमी तर सरासरी ६९४.१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ३,५०५.७५ मिमी तर सरासरी ४३८.२२ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी केवळ ४७.६० मिमी पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा तो २७.७९ टक्के कमी झाला आहे. यामुळे हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरल्याचेच दिसून येत आहे. बुधवारी कारंजा वगळता जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद नाही. कारंजा तालुक्यात ४.६० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित सातही तालुक्यांत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. उलट उन्ह तापत असून दमट वातावरण असल्याने पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जलसंचय होत नसल्याने पिण्याचे, औद्योगिक तथा पिकांना पाणी पुरविणे कठीण होणार आहे. बोर आणि धाम प्रकल्पामध्ये जलसाठा होणे अत्यंत गरजेचे असते; पण यंदा धाम प्रकल्पामध्ये केवळ १९.५६ टक्के तर बोर धरणात २५.२० टक्के जलसाठा आहे. धाम प्रकल्पाचे १५ दलघमी पाणी पिण्यासाठी तथा नोंदणीकृत उद्योगांकरिता आरक्षित आहे. शिवाय काही पाणी खरीप व रबी हंगामात पिकांना दिले जाते; पण आणखी काही दिवस पाऊस न आल्यास यात कपात करावी लागणार आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत किमान ५० ते ६० टक्के जलसाठा अपेक्षित असतो; पण यंदा पाऊसच न आल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही. परिणामी, उन्हाळ्यात पाणी कपात अटळ असून टंचाईची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकºयांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसते.ओल असल्याने पिकांची स्थिती समाधानकारकअधिक प्रमाणात पाऊस आला नसला तरी जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये अद्याप ओल आहे. उघाड मिळाल्याने शेतकरी डवरणी, निंदणाची कामे करीत आहे. यामुळे पिकांची वाढ होत आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. यामुळे सध्या पिकांची स्थिती समाधानकारक आहे. असे असले तरी आणखी काही दिवस पाऊस न आल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.स्वत: जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. सध्या पिके समाधानकारक आहे. डवरणी, निंदणाच्या कामामुळे पिकांना हरित द्रव्ये मिळत आहे. जमिनीतही ओल असल्याने पिके सुस्थितीत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास सोयाबीन, कपाशी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.