शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचे खिसे कापणारा जेरबंद

By admin | Updated: March 13, 2017 00:42 IST

स्थानिक लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून खिसेकापूला अटक केली. ही कारवाई

लोहमार्ग पोलिसांची कारवाई : मोबाईलसह चांदीचा ऐवज जप्त वर्धा : स्थानिक लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून खिसेकापूला अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानक परिसरात केली. चोरट्याकडून पोलिसांनी मोबाईल व चांदी असा एकूण ११ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिलिंद सुरेश (२९) रा. जुनी वस्ती इंझाडपुरा, बडनेरा जि. अमरावती असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांनुसार, वर्धा लोहमार्ग पोलिसांची चमू रात्र गस्तीवर असताना वर्धा रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर बिकानेर-सिकंदराबाद एक्सपे्रस आली. दरम्यान ओमप्रकाश वैंकटय्या रापौली (२७) रा. निजामपुरा बडोदा व संगीता सुनील माळी (२२) रा. हैद्राबाद यांनी आपला मोबाईल व चांदीचे साहित्य पळविल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय चोरटा वर्धा रेल्वे स्थानकावर उतरल्याचे म्हणत त्याचे थोडक्यात वर्णनही सांगितले. त्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी तीन चमू तयार केल्या. शोध मोहिमेदरम्यान वर्णन केलेला संशयीत इसम रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकींग परिसरात आढळून आला. पोलीस दिसताच त्याने पळ काढण्याच्या प्रयत्न केला असता त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक महागडा मोबाईल व चांदीचा ऐवज मिळून आला. ताब्यात घेतलेल्या चोरट्याविरुद्ध वर्धा लोहमार्ग पोलिसात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीसचे निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, हनवंते, लवटावार, मुंजेवार, राहुल येवले, नितीन शेंडे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)