शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

रामनगरात राडा

By admin | Updated: August 17, 2014 23:20 IST

स्वातंत्र्य दिनी निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता वर्धेतील महादेवपूरा येथील एका गटाने रामनगर येथील दुसऱ्या गटावर तलवारी व लाठ्याकाठ्यासह हल्ला चढविला.

दोन्ही गटांवर गुन्हे : ११ जणांना अटक वर्धा : स्वातंत्र्य दिनी निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता वर्धेतील महादेवपूरा येथील एका गटाने रामनगर येथील दुसऱ्या गटावर तलवारी व लाठ्याकाठ्यासह हल्ला चढविला. यात दोन्ही गटात जबर हाणामारी झाली. या हाणामारीत परिसरात तोडफोडही करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री शहर ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रावरीवरून एकमेंकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावर कारवाई करीत एकूण अकरा आरोपींना घटनेच्या रात्रीच अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींकडून दोन तलवारी व लाठ्या काठ्या जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यात आसिफ शेख महेबुब शेख, रूपेश नागदिवे, परवेज खान, शेख वसीम अब्दुल सत्तार सर्व रा. पुलफैल व शेख महोम्मद शेख गफ्फार रा. महादेवपुरा या पाच जणांसह उमेश उर्फ किसन राऊत, खुशाल राऊत, सौरभ आलोणे, राकेश दंडारे, प्रभाकर क्षिरसागर रा. तुकाराम वॉर्ड व सचिन कुमरे रा. कारला रोड या सहा जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनी निघालेल्या एका मिरवणुकीत राकेश नारायण दंडारे रा. तुकाराम वॉर्ड व आशिष पुरोहित रा. गुलशन हॉटेलजवळ या दोघांत वाद झाला. या वादात दोघांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. या प्रकरणाचा वचपा काढण्याकरिता आशिष याने त्याच्या सहकाऱ्यासह रामनगर परिसरातील तुकाराम वॉर्ड येथे हल्ला चढविला. यावेळी त्याच्यासोबत परवेज, जुनेद, जुबेर या तिघांसह आणखी दहा ते बारा जण असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यादरम्यान पानटपरीवरून खर्रा घेवून परत येत असलेल्या राकेश दंडारे याला मारहाण करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बंटी राऊत, आशिष राऊत, अमित कावळे याच्यासह दहा ते बारा जणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यात दोन्ही गटात जबर मारहाण केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या वादाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी काही जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्यात तोडफोड झालेल्या तिनही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. सोबतच हल्ल्यात वापरण्यात आलेल्या तलवारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी राकेश दंडारे व आशिष पुरोहित या दोघांनी एकमेकांविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ४२७ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक बाबरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)