शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासोबतच रबीचीही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:21 IST

शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी व नवीन कर्जाची प्रतीक्षाच : अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत. आज ना उद्या आर्थिक स्थिती सुधारेल, या अपेक्षेत कष्ट उपसणाºया शेतकºयांना आता खरीप हंगामासोबतच रबीचीही चिंता सतावत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघटना पूढे आल्या. सत्ता गेल्यावर शेतकºयांची आठवण येणाºया राजकीय पक्षांचे यात्रा व मोर्चे पाहिले. सत्तेत नसताना शेतकºयांच्या प्रश्नावर भावनिक आंदोलन करून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आले; पण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, हे कुणाच्या लक्षातच आले नाही. खरीप हा शेतकºयांच्या वर्षभराच्या खर्चाचा भार उचलणारा हंगाम असतो. या हंगामात शेतातील पिके हिरवीगार दिसतील एवढाच पाऊस आला. यानंतर उन्हही तापू लागल्याने शेतातील पिकांना पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी, खरीपाचे आर्थिक गणित कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांवर अत्यल्प पावसामुळे अनेक रोगांनी तथा अळ्यांनी आक्रमण केले आहे. यामुळे ही दोन्ही पिके कितपत हाती येतात, हा प्रश्नच आहे. परिणामी, खरीप हंगाम धोक्याचा तर ठरणार नाही ना, ही चिंता शेतकºयांना त्रस्त करीत आहे.सेलू तालुक्यातील शेतकºयांना रबी हंगामात आर्थिक सुबत्ता देणाºया यशवंत धरणात पावसाच्या कमतरतेमुळे जलसंचयच झाला नाही. यामुळे यावर्षी रबी हंगामात पाटाचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून हे वर्षही शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटीत करणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. समाधानकारक पाऊस येणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. यामुळे शेतकºयांनी जोमाने कपाशी, सोयाबीन, तुरीची पेरली केली; पण दरवर्षीप्रमाणे पावसाने हुलकावणी दिली. यंदा तर सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. यामुळे हिरवी दिसत असली तर अनेक रोग, अळ्यांमुळे पिकांवर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. आता रबी हंगामालाही पाणी मिळणे कठीण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाल्याचेच दिसते.