शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रबी क्षेत्रात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:37 IST

यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : पाण्याचे नियोजन करून गहू, चन्याची लागवड करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तूलनेत रबी पीक लागवडीच्या क्षेत्रात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. शिवाय गहू व चना पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून तसेच त्याचे योग्य नियोजन करूनच सदर पिकांची लागवड करावी, असा सल्ला सध्या त्यांच्याकडून दिल्या जात आहे.वर्धा जिल्ह्यात सुमारे ६२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली जाते. जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे समाधानकारक पाऊस झाल्यावर हे क्षेत्र ९५ हजार हेक्टर होईल असे बोलले जात होते. परंतु, यंदा पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक जलाशये तळ दाखवत आहेत. शिवाय शेतातील विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे रबी पिकांना दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी चना पिकाची लागवड करावी. असे न केल्यास चना उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लाऊ शकते. तर ज्याच्याकडे पिकाला सहा वेळा पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी यंदा गहू पिकाची लागवड करावी, असेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रबी हंगामाच्या तयारीत असणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात यंदा शेती करावी.चन्याचे वाण कमी पाण्यात तग धरणारेज्यांच्याकडे दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी चना पिकाची लागवड करताना जॅकी ९२१८ या वाणाची निवड करणावी. चन्याचे हे वाण कमी पाण्यात तग धरणारे असल्याने उत्पन्न समाधानकारक होण्याची शक्यता असते. तर ज्यांच्याकडे पिकाला चार पाणी देण्याची व्यवस्था आहे त्या शेतकºयांनी विशाल व विजय या चन्याच्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी, असे सांगण्यात आले.मुबलक पाणी नसेल तर गव्हाची लागवड धोक्याचीज्या शेतकऱ्यांकडे पिकाला सहा वेळा पाणी देता येईल अशाच शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात गहू पिकाची लागवड करावी. ज्यांच्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची लागवड करण्याचे टाळले पाहिजे. अन्यथा त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.२० दिवसांच्या अंतराने पिकाला द्यावे पाणीजमिनीत ओलावा असेल तर पेरणीनंतर २० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. जॅकी वानाच्या चन्याची लागवडीसाठी निवड केल्यास पिकाला २० दिवसांनी पहिल्यांदा तर ६० दिवसांनी दुसऱ्यांना पाणी द्यावे. तर चन्याच्या विशाल व विजय वानाची निवड शेतकऱ्यांनी केली असल्यास त्यांनी पिकाला २०,६० व ८० दिवसानंतर पाणी द्यावे.तर गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीत ओलावा नसल्यास पेरणीला पहिल्यांदा पाणी द्यावे. त्यानंतर २०-२० दिवसाच्या अंतराने सहा टप्प्यात गव्हाला सिंचन करावे. पाण्याचे योग्य नियोजन करून रबी पीक घेतल्यास शेतकºयांना संभाव्य धोका टाळता येत असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडला आहे. शिवाय जिल्ह्यातील जलायशांच्या पाणी पातळीतही पाहिजे तशी वाढ पावसाळ्यात झाली नाही. त्यामुळे रबी पीक घेण्याचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून चना व गहू पिकाची लागवड करावी.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.