शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तमुळे रबी क्षेत्रात १३ हजार हेक्टरने वाढ

By admin | Updated: January 26, 2017 01:56 IST

कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त

१३ हजार हेक्टरची वाढ : हरभरा पिकाच्या क्षेत्रातही वाढ प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या अभियानामुळे पाणी उपलब्ध झाले असून तब्बल १३ हजार हेक्टर रबी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी ५५ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा, गहु पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ६८ हजार २५० हेक्टरमध्ये झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकानंतर शेतकरी रबी हंगामात हरभरा, गहु यासह अन्य पिकांची लागवड करीत असतात. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने यापूर्वी निर्धारित क्षेत्रातच रबी हंगामाची पेरणी होत होती. हे क्षेत्र कमी करून सिंचन सुविधा वाढविण्याकरिता राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे आदी अनेक कामे हाती घेण्यात आलीत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून बहुतांश शेतकरी रबी हंगामातील पिकांची पेरणी करू शकले आहेत. मागील वर्षी तुरीला सर्वाधिक भाव मिळाले होते. यामुळे यावर्षी तुरीचा पेरा वाढला होता. तूर हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्या शेतात रबी हंगामातील पिके घेता येत नाहीत. असे असले तरी जिल्ह्यातील रबी पिकांच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रात रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली होती. ती यंदा ६८ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. २४ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी ४जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. प्रकल्प पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानची कामे करण्यात आल्याने जलसाठा वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके जगविण्याकरिता या पाण्याचा फायदा झाला. जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्राला यंदा संरक्षित पाण्याचा वापर करता आला आहे. शिवाय याच पाण्यातून शेतकऱ्यांना रबी हंगामाकरिता जमिनी तयार करून ठेवता आल्यात. अप्रत्यक्षरित्याही शेतकऱ्यांना लाभ ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्याही फायदा झाला आहे. नाला सरळीकरण, खोलीकरण, बांध बंदिस्तीच्या कामांमुळे जलसाठा वाढला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतातील, अनेक गावांतील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कुपनलिकांची स्थितीही सुधारल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी, रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र वाढून ६८ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यात हरभरा पिकाचे प्रमाण अधिक आहे. ही कामे शेतकऱ्यांना लाभदायकच ठरत आहेत. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.