शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार हेक्टरने वाढणार रब्बीचा पेरा

By admin | Updated: November 9, 2016 00:55 IST

खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे.

गहू व चणा क्षेत्र वाढण्याचा अंदाज : कृषी विभागाने केले ७५ हजार हेक्टरमध्ये नियोजन वर्धा : खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ७४ हजार ९०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६० हजार ८३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. यात यंदाच्या हंगामात सुमारे १४ हजार हेक्टरने वाढ होण्याचे संकेत कृषी विभागाकडून मिळाले आहे. जिल्ह्यात चना व गव्हाचा पेरा वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यावरून दिसत आहे. यंदाच्या हंगामात गव्हाचा पेरा २५ हजार हेक्टरवर तर चन्याचा पेरा ४२ हजार हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात सांगण्यात येत आहे. गत हंगामात गव्हाचा पेरा २१ हजार ९५० तर चन्याचा पेरा ३७ हजार ९१ हेक्टरवर झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यंदा जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचन करण्यास अडचण जाणार नसल्याने गहू व हरभऱ्याचा पेरा वाढण्याचे संकेत कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून दिले आहेत.रबी हंगामाकरिता शेतजमिनी तयार करण्याच्या कामात बळीराजा व्यस्त झाला असून रबीच्या बियाण्यांकरिता त्याची धावपळ सुरू झाली आहे. मात्र खरीप हंगामात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसल्याने त्याच्या गाठीला शिल्लक नसल्याने रबीचा पेरा कसा करावा या विवंचनेत तो असल्याचे दिसून येत आहे. यातही महाबीजकडून होणारा बियाण्यांचा पुरवठा अत्यल्प असल्याने बियाण्यांकरिता भटकंती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन हंगामात बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची होत असलेली ही लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी) इतर क्षेत्रातही वाढीचे संकेत रबी हंगामात गहू व चना या मुख्य पिकांसह ज्वारीचा पेराही करण्यात येतो. गत हंगामात जिल्ह्यात १ हजार १४९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला होता. तो यंदा अडीच हजार हेक्टरवर होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त करडई, तिळ, मोहरी, जवस, आदी पिकांचीही लागवड करण्यात येणार आहे. त्याचे क्षेत्रही वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. महाबीजकडून मिळणार निम्मे बियाणे शेतकऱ्यांना कमी दरात व विश्वासाचे बियाणे म्हणून शासनाच्या महाबीजच्या बियाण्यांकडे पाहिले जाते. मात्र या कंपनीकडून जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविण्यात येते. जिल्ह्यात गव्हाच्या २१ हजार ४५० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून केवळ ६ हजार ७०० क्विंटल बियाणे पुरविण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. हरभऱ्याची १५ हजार ६४० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून ४ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुुळे शेतकऱ्यांना बियाण्यांकरिता खासगी दुकानात चकरा मारण्याची वेळ येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाल्याचे दिसत आहे.