शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

हजसाठीचा कोटा ७० वरून ९० टक्के व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:26 IST

हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. मागील वर्षी १ लाख ७५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे २ लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे.

ठळक मुद्देजमाल सिद्दीकी : दोन लाख मुस्लिम बांधव जाणार हज यात्रेला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. मागील वर्षी १ लाख ७५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे २ लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे. हज समितीच्या कोट्यातून सदर यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता हज समितीचा कोटा ७० वरून ९० टक्के करण्यात यावा, अशी मागणी हज समितीचे राज्याध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.ना. जमाल सिद्दिकी पुढे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातून ६४ इच्छुकांनी हज यात्रेला जाण्यासाठी आवेदन केले आहे. त्यापैकी ४८ मुस्लिम बांधव यंदा हज यात्रेसाठी जाणार आहे. तर महाराष्ट्राचा विचार केल्यास हा आकडा १६ हजार इतका आहे. राज्यभरातून यंदा ३५ हजार ७११ अर्ज प्राप्त झाले आहेत. मोदी सरकारने हज जाणाºयांच्या कोट्यात २५ टक्क्यांनी वाढ केल्याने याचा प्रत्यक्ष लाभ मुस्लिम बांधवांना होत आहे. यंदा १४ जुलैपासून हज यात्रेकरू त्यांच्या पुढील प्रवासाकरिता रवाना होणार आहे. महाराष्ट्रातील हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणारे मुस्लिम बांधव आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबाद आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई व उपराजधानी असलेल्या नागपूर तसेच औरंगाबाद येथून पुढील प्रवासासाठी जाणार आहे.हज यात्रेकरूंना सुविधा मिळावी या हेतूने जिल्हा स्तरावर लवकरच समितींचे गठण होणार आहे. या समितीत अध्यक्ष, उपाध्यक्षासह एकूण ११ सदस्य राहणार आहेत. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात सुमारे ३० हाजी दोस्त नियुक्त केले जाणार आहेत. सध्या स्थितीत हज समितीच्या माध्यमातून हज यात्रेसाठी जाणाºयाला सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्च येतो. शिवाय खासगी कंपन्या चार ते साडेचार लाखांमध्ये मुस्लिम बांधवांना हज यात्रा घडविते.हज यात्रेवरील खर्च कमी व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन समुद्रमार्गे जहाजाचा वापर हज यात्रेसाठी कसा करता येईल, यासाठी सध्या विशेष प्रयत्न होत आहेत. हज यात्रेकरूंची कुठल्याही पद्धतीने फसवणूक होऊ नये म्हणून एच.ओ.जी. नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून त्यावर अधिकृत एजन्सीजची माहिती आहे. शिवाय हजसाठी गेलेल्यांना सुविधा व्हावी म्हणून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून तो त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहे. कुठलीही खासगी कंपनी हज यात्रेकरूंना करारानुसार सुविधा पुरवित नसेल तर त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासारखी कठोर कारवाई केल्या जाणार असल्याचेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला फैय्याझ खान, बिस्मील्ला खान, रहीम हाजी, फारूक भाई, तौफिक नुरानी आदींची उपस्थिती होती.डॉलरची किंमत वाढल्याने हजचा खर्च वाढलाडॉलरची किंमत वाढल्याने हज यात्रेचा खर्च वाढला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात सबसिडी दिल्या जात असे. त्याचा प्रत्यक्ष फायदा केवळ एअर लाईन कंपन्यांना मिळत होता. हाजींनी सरकारचा एक रुपया घेतला नसून उलट ते देत आहेत. मुस्लिम बांधव कुणाच्या पैशावर हजला जात नाही. मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळात मुस्लिम बांधवांच्या माथी असलेला कलंक पुसला आहे, असेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.