शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांच्या समस्या त्वरित सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:18 IST

जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभीम टायगर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सदर झोपडपट्टी धारक गत अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत. ज्या जागेवर ते राहत आहेत. त्या जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे त्यांना देण्यात आले नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांना तात्काळ जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अतुल दिवे, विशाल रामटेके, पंकज लभाने, सुरज बडगे, स्वप्नील गोटे, कुणाल सहारे, आशीष जामुळकर, नितीन कुंभारे, प्रदीप कांबळे, सुरज मुन, मंगेश मेश्राम, प्रज्वल डंभारे, प्रकाश कोरडे यांच्यासह भीम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरपीआयच्या नेतृत्त्वात जिल्हाकचेरीवर धडकजिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांच्या समस्या निकाली काढा यासह शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेतृत्त्वात सोमवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येताच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व जि.प. सदस्य तथा आरपीआय (आ.) चे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी केले. सदर मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. झोपडपट्टीवासियांना त्वरीत जमिनीचे पट्टे द्या, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना त्वरीत कर्ज वितरित करा, पेट्रोल-डिझेल स्वस्त करा, बेरोजगारांच्या हाताला काम द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चात शेतकरी, शेतमजुर व अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.