शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ मृत्यूची चौकशी करून नराधमांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:39 IST

सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देसयाम यांची मागणी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमतवर्धा : सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची चौकशी करून नराधमांना फाशी द्या, अशी मागणी गोंडवाना एकता परिषदेचे अवचित सयाम यांनी केली आहे.शुभांगीच्या मृत्यू प्रकरणी १९ मार्च रोजी दहेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुभांगी दहेगाव येथे मैत्रीणीच्या साक्षगंधाला गेली होती. सायंकाळी ती मैत्रीणींसह परत निघाली. मैत्रीणी घरी पोहोचल्या व शुभांगी शेतातील आपल्या घराकडे निघाली; पण घरी पोहोचली नाही. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने शोध घेतला असता रेल्वे फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला. सँडल व पायावरून ओळख पटली. मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने हत्या की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तपास प्रभारी ठाणेदार विलास काळे यांच्या मार्गदर्शनात संघपाल इंगोले व रवी पुरोहित करीत आहेत.शुभांगीच्या अंगावर वस्त्र नसून कपडे काढून कुणी आत्महत्या करणार नाही. यामुळे तिच्यावर बलात्कार झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून नराधमांना फाशी द्यावी, अशी मागणी सयाम यांनी केली आहे. याबाबत अनु. जनजाती आयोग न्यू दिल्ली, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.