शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

कव्वाली व सुफीगीतांची जुगलबंदी रंगली

By admin | Updated: September 6, 2014 02:17 IST

आपल्या सुरांची जादू पसरवित गायक-गायिकांनी परस्परांना दिलेले सुरेल आव्हान, वादक कलावंतांची सुमधूर साथ व निवेदकांनी शायराना लकबीत घेतलेली...

वर्धा : आपल्या सुरांची जादू पसरवित गायक-गायिकांनी परस्परांना दिलेले सुरेल आव्हान, वादक कलावंतांची सुमधूर साथ व निवेदकांनी शायराना लकबीत घेतलेली एकमेकांची फिरकी, अशा वातावरणातील संपूर्ण सभागृहाला वेळेचे व वयाचे भान विसरायला लावणाऱ्या अनोख्या मैफलीने संगीतप्रेमींना जिंकले़ निमित्त होते, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठद्वारे सावंगी (मेघे) येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेल्या कव्वाली व सुफी गीतांच्या जुगलबंदीचे!रिद्धी-सिद्धी सांस्कृतिक मंचाद्वारे सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुंबईकर कव्वाल व नागपूर येथील सुफीयाना मिजाज जोपासणाऱ्या कलावंतांच्या संचामध्ये ही सुरेल जुगलबंदी रंगली. या कार्यक्रमात आलोक कटधरे, अलिसिया शेट्टी, सूरज शर्मा (मुंबई) आणि सुरभी ढोमणे, मोहम्मद शहाजीद, मंगेश वानखेडे (नागपूर) या गायकांनी गायकीचे दोन भिन्न प्रवाह सादर करीत अखेर मानवता हाच आमचा खरा धर्म आहे, यावर मोहोर उमटविली. तेरी दिवानी, इश्क सुफियाना, अल्लाहूं, हम तेरे बिन, ताकते रहते तुझको, अली मोरे अंगना, चढता सुरज धिरे-^^धिरे, निगाहे मिलाने को, तेरी महफील में, वादा तेरा वादा, झुम बराबर झुम, शिर्डीवाले साईबाबा, दमा दम मस्त कलंदर आदी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी सदर करीत रसिकांना भूरळ घातली़ संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत नियोजन सचिन ढोमणे यांनी केले होते. गायकांना महेंद्र ढोले (आॅर्गन), अमर शेंडे (व्हॉयोलिन), प्रसन्न वानखेडे (गिटार), सचिन ढोमणे (तबला), बंडू गोहणे (आॅक्टोपॅड), दीपक कांबळे (ढोलक) व विक्रम जोशी (ताल वाद्य) यांनी संगीतसाथ केली. परस्परांना सवाल-जबाब करीत सूत्रसंचालक निसार खान व श्वेता शेलगावकर यांनी अखेरपर्यंत ही जुगलबंदी रंगतदार ठेवली. कार्यक्रमास साजेसे नृत्याविष्कारही सादर झालेत़प्रारंभी दिनेश मिश्रा व गायक, वादक कलावंतांचा कुलपती दत्ता मेघे व मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील कलाप्रेमी रसिकांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.(कार्यालय प्रतिनिधी)