शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नऊ वर्षीय रूपेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:03 IST

नऊ वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. हे चर्चित खून प्रकरण वर्धा शहरातील असून रेणुका हिरामण मुळे असे या दुदैर्वी आईचे नाव आहे.

ठळक मुद्देमातेची उच्च न्यायालयाला विनंती : बहुचर्र्चित नरबळी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नऊ वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. हे चर्चित खून प्रकरण वर्धा शहरातील असून रेणुका हिरामण मुळे असे या दुदैर्वी आईचे नाव आहे.पोटचा गोळा रूपेश याचा अमानुष खून झाला आहे. या प्रकरणात नऊ आरोपी असून त्यात आसिफ शहा ऊर्फ मुन्ना पठाण (४६) या मुख्य आरोपीसह उत्तम महादेव पोहणे, अंकुश सुरेश गिरी, दिलीप बाळकृष्ण भोगे, सुरेश रामराव धानोरे, सुभाष बापूराव भोयर, विनोद ऊर्फ बंसी किसन क्षीरसागर व सतीश प्रभाकर कलोडे यांचा समावेश आहे. १ जुलै २०१७ रोजी सत्र न्यायालयाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून या सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला रेणुका मुळे यांनी अपीलद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी रूपेशचे अपहरण करून अमानुष खून करण्यात आला होता. दुसºया दिवशी ईसाजी ले-आऊट परिसरात रूपेशचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे शरीर छिन्नविछीन्न करण्यात आले होते. डोळे, किडनी, गुप्तांग, मोठे आतडे आदी अवयव काढून घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपी पठाण याला १५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या बयानावरून अन्य आरोपींना अटक झाली होती. आरोपींनी गुप्तधनाकरिता व अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा खून केला, असे रेणुका मुळे यांचे म्हणणे आहे.आरोपींना अटक करण्याचे आदेशया प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख आणि रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, राज्य सरकार सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता मुळे यांचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले. तसेच, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९० अंतर्गत प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून सत्र न्यायालयासमक्ष हजर करण्याचा आदेश दिला. सदर कलमातील तरतुदीनुसार सत्र न्यायालय हे अपील प्रलंबित असेपर्यंत आरोपींना कारागृहात पाठवू शकते किंवा त्यांना जामिनावर सोडू शकते. रेणुका मुळे यांच्यावतीने अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बाजू मांडली.

टॅग्स :Murderखून